News Flash

Photos: आकाश अंबानीच्या साखरपुड्याला कलाकारांची मांदियाळी

या जंगी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

Akash Ambani Shloka Mehta engagement
आकाश अंबानीच्या साखरपुड्याला कलाकारांची मांदियाळी

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीचा साखरपुडा श्लोका मेहता हिच्याशी शनिवारी पार पडला. अंबानी यांच्या ‘अँटालिया’ या निवासस्थानी हा शानदार समारंभ आयोजित करण्यात आला होता. करण जोहर, आमिर खान, काजोल, रेखा, अनिल कपूर, श्रद्धा कपूर, माधुरी दीक्षित यांसारख्या बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्यास हजेरी लावली होती.

या जंगी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

श्लोका ही प्रसिद्ध हिरेव्यापारी रसेल मेहता यांची धाकटी मुलगी आहे. आनंद आणि श्लोका हे दोघंही एकमेकांना शाळेपासूनच ओळखतात असंही म्हटलं जात आहे. आकाश आणि श्लोका या दोघांचीही कुटुंब पाहता त्यांच्या लग्नाचा थाट अद्वितीय असणार यात शंकाच नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2018 4:10 pm

Web Title: akash ambani shloka mehta engagement inside pics videos of the star studded affair
Next Stories
1 तू तिथे मी! निकसोबत ब्राझीलमध्ये पोहोचली प्रियांका
2 मी कधी परतणार हे मलाच माहित नाही- इरफान खान
3 अशी सुरू आहे दीपिका -रणबीरच्या लग्नाची जय्यत तयारी
Just Now!
X