23 February 2019

News Flash

‘धडक’विषयी परश्या म्हणतोय..

प्रदर्शनापूर्वी नागराज मंजुळे आणि 'सैराट'च्या टीमसाठी दिग्दर्शक शशांक स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन करणार आहे.

आकाश ठोसर

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला याड लावलं. आर्ची आणि परश्याच्या प्रेमकथेनं सर्वांचीच मनं जिंकली होती. बॉक्स ऑफीसवर घसघशीत कमाई करणाऱ्या या चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘धडक’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. पुढच्या शुक्रवारी म्हणजेच २० जुलै रोजी शशांक खैतान दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांकडून संमीश्र प्रतिसाद मिळत आहे. मात्र ‘धडक’चा ट्रेलर ‘सैराट’च्या परश्याला म्हणजेच अभिनेता आकाश ठोसरला फार आवडला आहे.

‘धडक’बद्दल पहिल्यांदाच आकाशने प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला चित्रपटाचा ट्रेलर प्रचंड आवडला आणि आता चित्रपट पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहे. जान्हवी कपूर आणि इशान खट्टरने त्यात उत्तम अभिनय केलं असणार याची मला खात्री आहे. त्या दोघांनाही माझ्याकडून शुभेच्छा,’ असं तो म्हणाला.

Bigg Boss Marathi : मेघा, सई आणि पुष्करच्या मैत्रीत पुन्हा फूट?

प्रदर्शनापूर्वी नागराज मंजुळे आणि ‘सैराट’च्या टीमसाठी दिग्दर्शक शशांक स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन करणार आहे. सुरुवातीपासूनच ‘धडक’ची तुलना ‘सैराट’सोबत केली जात आहे. त्यामुळे टीकांनाही सामोरं जाण्याची माझी तयारी आहे असं शशांकने एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यामुळे बॉक्स ऑफीसवर चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First Published on July 12, 2018 3:40 pm

Web Title: akash thosar reaction on sairat hindi remake dhadak