18 March 2019

News Flash

खासगी फोटो लीक झाल्यानंतर अक्षराची मुंबई पोलिसांकडे धाव

या फोटोंचा चुकीच्या पद्धीतीनं वापर करण्यात आला आहे. त्यामुळे अक्षरानं आता मुंबई पोलीस आणि सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.

अक्षरा हसन हिचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कमल हसन यांची मुलगी अक्षरा सायबर क्राइमची शिकार झाली आहे. अक्षराचे काही खासगी फोटो हे सोशल मीडियावर लीक झाले आहे. या फोटोंचा चुकीच्या पद्धीतीनं वापर करण्यात आला आहे. त्यामुळे अक्षरानं आता मुंबई पोलीस आणि सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.

एकीकडे आपल्या देशात #MeToo सारखी मोहीम राबवली जात आहे. तर दुसरीकडे असे लोकही आहेत जे मुलींचे खासगी फोटो केवळ आसुरी आनंदासाठी सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. दुर्दैवानं मी सायबर क्राईमची शिकार झाली आहे. माझे फोटो कोणी आणि का व्हायरल केले याची मला कल्पना नाही. पण केवळ मज्जेसाठी तरुण मुलींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. असं म्हणत अक्षरानं आपली खंत व्यक्त केली आहे.

तिनं ट्विट करत मुंबई पोलिसांकडे मदतनीची विनंती केली आहे. या प्रकाराच्या तळापर्यंत जाऊन पोलिसांनी गुन्हेगाराचा शोध घ्यावा असं तिनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

First Published on November 9, 2018 2:08 pm

Web Title: akshara haasan private photo leaked on social media