बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘स्थलुपराण’ हा मराठी चित्रपट झळकला होता. या चित्रपटाचा मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकने नुकताच ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने परदेशी आणि भारतीय सिनेमांमध्ये असलेला फरक सांगितला आहे.

अक्षयने आजपर्यंत अनेक देशांमध्ये जाऊन तेथील चित्रपट महोत्सवांना हजेरी लावली आहे. त्यामुळे त्याने भारतीय सिनेमे आणि परदेशी सिनेमा यामध्ये नेमका काय फरक असतो हे सांगितले आहे. ‘सिनेमाचे वेगवेगळे प्रवाह एकाच ठिकाणी काम करत असतात. या इंडस्ट्रीमध्ये अतिशय ताकदीने काम करणारे अनेक लोकं आहेत’ असे अक्षयने म्हटले आहे.