बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन आणि बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा एकत्र सिनेमात पाहायला मिळणार आहेत. एक किंवा दोन नाही तर तब्बल दहा वर्षांनी ते एका सिनेमात एकत्र काम करणार आहेत. बॉलिवूडमधले नावाजलेले दिग्दर्शक आर. बल्की यांच्या आगामी सिनेमात हे दोन सितारे दिसणार आहेत. या सिनेमाचे शिर्षक अजून ठरले नसले तरी अमिताभ आणि अक्षय मात्र या सिनेमात असणार हे जवळपास नक्की झाले आहे.

आर. बल्की यांनी याआधी अमिताभ यांच्यासोबत ‘कि अ‍ॅण्ड का’, ‘चीनी कम’, ‘शमिताभ’ आणि ‘पा’ यांसारख्या सिनेमात एकत्र काम केले आहे. तर खिलाडी अक्षय कुमारचा बल्कीसोबतचा हा पहिलाच सिनेमा असेल. नेहमीच प्रेक्षकांना काही तरी नवीन देण्यासाठी ओळखले जाणारे आर. बल्की आता कोणत्या संहितेवर काम करत आहेत याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

सध्या या सिनेमाच्या कथानकावर काम सुरु आहे. यात अक्षयची मुख्य भूमिका असणार आहे, तर त्याच्या वडिलांची भूमिका अमिताभ बच्चन करणार आहेत. पण या सिनेमात अभिनेत्री कोणती असेल, अभिनेत्री असणार की नाही याबद्दलही अजून कळू शकले नाही. याशिवाय इतर कलाकारांचीही अजून निवड होणे बाकी आहे.

आर. बाल्की त्यांच्या नव्या सिनेमाच्या कथानकावर काम करत आहेत. यात मुख्य भूमिका अक्षय करणार आहे. अक्षयच्या वडिलांची भूमिका अमिताभ बच्चन करणार आहेत. इतर कलाकारांची निवड अद्याप बाकी आहे. अमिताभ यांनी यापुर्वी विपूल शहाच्या ‘वक्त’ आणि मधुर भांडारकर याच्या ‘आन’ या सिनेमात अक्षयच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

आर. बल्कि यांनी अक्षयची भेट घेऊन त्याला सिनेमाची कथा ऐकवली होते. अक्षयला या सिनेमाची कथा एवढी आवडली की त्याने तात्काळ या सिनेमासाठी होकारही कळवला. या सिनेमाचे नाव अद्याप ठरले नसून, येत्या दिवसात ते निश्चित होईल. सध्या आर. बल्की यांची पत्नी गौरी शिंदे हिचा ‘डिअर जिंदगी’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पुढील वर्षी या सिनेमाचे चित्रिकरण सुरू होईल.