News Flash

‘हे बेबी’मधील ‘ऐंजल’ आठवते का?

साजिद खानचा दिग्दर्शन क्षेत्रातील हा दुसरा सिनेमा होता

दिग्दर्शक साजिद खानच्या ‘हे बेबी’ सिनेमातील ‘ऐंजल’ आठवते का? ते गोंडस बाळ आजही कोणी विसरू शकत नाही. ‘हे बेबी’ या सिनेमाचा उल्लेख जेव्हा केला जातो तेव्हा सगळ्यात आधी ही गोंडस मुलगी प्रेक्षकांच्या नजरेसमोर येते. या ऐंजलचे खरे नाव यानी जुआना सांघवी असे आहे. हा सिनेमा येऊन आता १० वर्षे लोटली. या दहा वर्षांत ऐंजल फार मोठी झालीये आणि तेवढीच सुंदरही दिसते.

अक्षय कुमार, रितेश देशमुख, फरदीन खान आणि विद्या बालन यांच्यासोबत ‘हे बेबी’मध्ये काम केले होते. या सिनेमात ती विद्या आणि अक्षयची मुलगी दाखवण्यात आली होती. साजिद खानचा दिग्दर्शन क्षेत्रातील हा दुसरा सिनेमा होता. या सिनेमापासून साजिदला दिग्दर्शक म्हणून एक नवीन ओळख मिळाली.

सिनेमात अक्षय, रितेश आणि फरदीनच्या घराबाहेर अचानक अज्ञात व्यक्ती एक मुलगी सोडून जाते. सुरूवातीला मुलीला समजून घेण्यात त्यांना फार त्रास होतो पण नंतर मात्र या तिघांच्या आयुष्याचं केंद्रस्थान होते. २००७ मध्ये आलेल्या या सिनेमात बोमन इराणी यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. शंकर एहसान लॉय यांचे संगीत असलेल्या या सिनेमाची अनेक गाणी आजही आवडीने ऐकली जातात. अक्षय कुमारचा या सिनेमातला अंदाज अनेकांची मनं जिंकून गेलेला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 2:53 pm

Web Title: akshay kumar baby in heyy baby movie angel now looks like this
Next Stories
1 PHOTO : …अन् प्रार्थनाने त्याचीच साथ देण्याचा निर्णय घेतला
2 ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ नक्की आहे तरी काय?
3 PHOTO: विनोदाची राणी अडकली विवाहबंधनात
Just Now!
X