30 May 2020

News Flash

अक्षय कुमार ‘या’ अभिनेत्रीसाठी बनला मेकअप आर्टिस्ट

हा व्हिडीओ 'मिशन मंगल' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे

सध्या बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट ‘मिशम मंगल’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. मिशन मंगलची संपूर्ण टीम प्रमोशनदरम्यान वेगवेगळ्या गोष्टींमधून आनंद लूटताना आणि मस्ती करताना दिसते. आता सोशल मीडियावर मिशन मंगलच्या प्रमोशनदरम्यानचा अक्षय कुमारचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार मेकअप आर्टिस्ट बनला आहे. अक्षय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या चेहऱ्यावर मेकअप करताना दिसत आहे. दरम्यान अक्षय सोनाक्षीच्या नाकावर स्पंज जोरात दाबतो आणि त्यामुळे सोनाक्षी जोरात ओरडते. त्यानंतर सोनाक्षी मस्तीमध्ये अक्षयला मारते. अक्षयने केलेल्या मेकअपमुळे सोनाक्षीला कोणी ओळखणार नाही असे सोनाक्षी व्हिडीओमध्ये म्हणते. त्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन जगनशक्ती केले असून हा चित्रपट नोव्हेंबर २०१३ मध्ये इस्त्रोने केलेल्या मंगळयानाच्या प्रोजेक्टवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अक्षयने राकेश धवन ही भूमिका साकारली असून तो या मोहिमेचे नेतृत्व करताना दिसत आहे. त्याच्याव्यतिरिक्त या टीम तारा शिंदे (विद्या बालन), कृतिका अग्रवाल (तापसी पन्नू), एका गांधी (सोनाक्षी सिन्हा), शर्मन जोशी (परमेश्वर नायडू), नेहा सिद्दिकी (कृति कुल्हारी) नजर हे कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट १५ ऑगस्टरोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2019 6:23 pm

Web Title: akshay kumar became makeup artist for sonakshi sinha avb 95
Next Stories
1 अक्षय कुमारने विद्या बालनच्या लगावली कानाखाली, जाणून घ्या कारण
2 Batla House Movie Review : दमदार संवाद, अभिनयासह देशातील सर्वांत चर्चित एन्काऊंटरची कहाणी
3 ‘शोले’ बद्दल या रंजक गोष्टी माहितीयेत का?
Just Now!
X