News Flash

‘बेल बॉटम’ चित्रपटासाठी अक्षय कुमारने मोडला १८ वर्षांचा नियम

चित्रपटाचं सध्या स्कॉटलंडमध्ये चित्रीकरण सुरु आहे

अभिनेता अक्षय कुमार आपल्या शिस्तप्रिय स्वभावासाठी बॉलिवूडमध्ये प्रसिद्द आहे. बॉलिवूडच्या झगमगाटात वावरताना त्याने काही नियम आखले असून त्याचं कडक पालन करत असतो. मात्र नुकतंच अक्षय कुमारने ‘बेल बॉटम’ चित्रपटासाठी गेल्या १८ वर्षांपासून आखून ठेवलेला एक नियम मोडला आहे. करोना संकटामुळे अडकलेल्या या चित्रपटाचं सध्या स्कॉटलंडमध्ये चित्रीकरण सुरु आहे.

स्कॉटलंडमध्ये पोहोचल्यानंतर १४ दिवस क्वारंटाइन राहावं लागल्याने निर्मात्यांच्या नुकसानाची कल्पना असल्याने अक्षय कुमारने मदतीसाठी धाव घेतली. यावेळी त्याने आपल्या १८ वर्षांचा नियम मोडला. गेल्या १८ वर्षांपासून अक्षय कुमारने दिवसातून आठ तास काम करण्याचा नियम केला आहे. पण ‘बेल बॉटम’ चित्रपटाच्या निर्मात्यांचं नुकसान होऊ नये यासाठी अक्षय कुमारने डबल शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाचं लवकरात लवकर शुटिंग संपवण्याचा अक्षय कुमारचा प्रयत्न आहे.

जॅकी भगनानी या चित्रपटाचा निर्माता आहे. अक्षय कुमार निर्मात्याचा अभिनेता असून त्याच्यासोबत काम करणं नेहमीच एक चांगला अनुभव असतो असं म्हटलं आहे. गेल्या १८ वर्षात पहिल्यांदाच अक्षय कुमार डबल शिफ्ट करत असल्याचं त्याने सांगितलं आहे.

रंजित तिवारी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री हुमा कुरेशी, वानी कपूर, लारा दत्ता या अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहेत. हा चित्रपट २ एप्रिल २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, येत्या काळात अक्षयचे ‘सूर्यवंशी’ ‘लक्ष्मी बम’, ‘पृथ्वी राज’ ‘बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’ ‘धूम 4’ आणि ‘बेल बॉटम’ असे एकूण सात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तसंच लवकरच तो ‘बाप रे बाप’ या चित्रपटातही झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 11:12 am

Web Title: akshay kumar breaks his 18 year rule for film bellbottom sgy 87
Next Stories
1 Birthday Special: “शाहिद आणि माझ्यात…”; ब्रेकअपनंतर १३ वर्षांनी करिना पहिल्यांदाच ‘त्या’ नात्याबद्दल बोलली तेव्हा
2 अमृता सुभाषने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिला अनुरागला पाठिंबा, म्हणाली…
3 मिशी काढल्याने तृतीयपंथ्याशी तुलना करणाऱ्याला संतोष जुवेकरचा भन्नाट रिप्लाय, म्हणाला “मित्रा जे…”
Just Now!
X