25 November 2017

News Flash

अक्षय कुमारचा मेव्हणा लवकरच बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण

दिग्दर्शक टोनी डिसूझा करणार लाँच

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 12, 2017 9:00 AM

करण कपाडिया

अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा चुलत भाऊ आणि अक्षय कुमारचा मेव्हणा करण कपाडिया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ‘मि़ड डे’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार करण टोनी डिसूझाच्या प्रॉडक्शनअंतर्गत निर्मित चित्रपटातून पदार्पण करणार आहे. करण हा डिंपल कपाडियाची बहिण सिंपल कपाडियाचा मुलगा आहे.

टोनी डिसूझासोबत अक्षयने ‘ब्लू’ आणि ‘बॉस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय आणि अक्षयचे त्याच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे टोनीने करणला लाँच करावं अशी अक्षयची इच्छा आहे. १४ वर्षांचा असतानाच चित्रपटात काम करण्याची आवड असल्याचं मी अक्षय आणि मावशी डिंपल यांना सांगितलं होतं असं करण म्हणतो.

I c u

A post shared by Karan Kapadia (@karankapadia16) on

Before and after a month or so apart , 2 more to go Thank you for the help and the picture@mitenkakaiya

A post shared by Karan Kapadia (@karankapadia16) on

Throwback to a lean 185

A post shared by Karan Kapadia (@karankapadia16) on

पाहा, रणवीर म्हणतोय ‘माय नेम इज लखन’

याविषयी ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, ‘लहानपणी मी कोणाशी जास्त बोलत नव्हतो, जास्त कोणामध्ये मिसळत नव्हतो. त्यामुळे मला अभिनय क्षेत्रात करिअर करायचे असेल म्हणून कोणालाच वाटलं नव्हतं. पण जेव्हा माझी इच्छा मी कुटुंबीयांना सांगितली तेव्हा त्यांनी मला साथ दिली. हा प्रवास माझ्यासाठी सोपा नसेल हे त्यांनी (अक्षय आणि डिंपल) मला आधीच सांगितलं आहे.’

First Published on September 12, 2017 9:00 am

Web Title: akshay kumar brother in law karan kapadia to make bollywood debut