24 October 2020

News Flash

अक्षयने एका चित्रपटासाठी घेतलेला मानधनाचा आकडा ऐकून तुमचे डोळे विस्फारतील!

या चित्रपटाला अक्षयने फक्त १० मिनिटांत होकार दिला.

अक्षय कुमार

अक्षय कुमार हा बॉलिवूडमधला आघाडीचा अभिनेता.. सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान या तिन्ही खानपेक्षा सध्या अक्षयचीच चर्चा फार आहे. एकामागोमाग एक अशा चित्रपटांची रांगच अक्षयच्या मागे लागली आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘सूर्यवंशी’, ‘बेल बॉटम’, ‘बच्चन पांडे’ हे त्याचे आगामी चित्रपट असून त्यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे. अक्षयने आणखी एक चित्रपट नुकताच साइन केला असून त्यासाठी त्याने रग्गड पैसे घेतले आहेत असं समजतंय.

आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटात अक्षय मुख्य भूमिका साकारणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत सारा अली खान आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषसुद्धा प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटासाठी अक्षयने तब्बल १२० कोटी रुपये मानधन घेतल्याचं कळतंय. याबाबत अक्षयकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसून त्याच्या मानधनाची फार चर्चा होत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी अक्षयने फक्त दहा मिनिटांत होकार दिला आहे.

Video : तान्हाजींच्या वंशजांना का नाही पटला चित्रपटाचा शेवट?

याबद्दल तो एका मुलाखतीत म्हणाला, “आनंद एल राय ज्याप्रकारे एखादी कथा मोठ्या पडद्यावर मांडतात, ते खूप प्रशंसनीय आहे. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी फार उत्सुक आहे. या चित्रपटातील भूमिका माझ्यासाठी फार खास आहे. त्यामुळे मी त्याला नकार देऊ शकलो नाही.” अक्षयने सारा आणि धनुषसोबत काम करण्याबाबतही उत्सुकता व्यक्त केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सारा आणि अक्षय पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2020 6:58 pm

Web Title: akshay kumar charged rs 120 crore for aanand l rai next ssv 92
Next Stories
1 Video : तान्हाजींच्या वंशजांना का नाही पटला चित्रपटाचा शेवट?
2 आर्ची म्हणते, “नाइट लाइफ म्हणजे काय रे भाऊ?”
3 ‘तू देश सोडून जा’ असा सल्ला देणाऱ्या महिलेला जावेद जाफरीचे भन्नाट उत्तर, म्हणाला…
Just Now!
X