जपानची राजधानी टोक्योमध्ये २३ जुलैपासून ऑलिम्पिकला सुरुवात होत आहे. ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभाग घेण्यासाठी भारताची टीम टोक्योमध्ये रवाना झालीय. अशात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने एक व्हिडीओ शेअर करत खेळाडूंना प्रोत्साहन दिलं आहे.

क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर करत भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या होत्या. या व्हिडीओत त्यांनी अक्षय कुमारला नॉमिनेट केलं होतं. यावर अक्षय कुमारने अनुराग ठाकूर यांना रिप्लाय करत एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत अक्षयने भारतीय खेळाडूंना प्रोस्ताहन देत शुभेच्छा दिल्या आहेत. आपण सर्वांनी भारतीय खेळाडूंना साथ देणं गरजेचं असल्याचं अक्षय या व्हिडीओत म्हणाला आहे.

या व्हिडीओत अक्षय म्हणतोय, ” टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या दमदार खेळाडूंचं धैर्य वाढवायचं आहे. मला विश्वास आहे आपल्या प्रोत्साहनामुळे आणि आशिर्वादांमुळे भारताचे खेळाडू टोक्यो ऑलिम्पिकमध्ये देशाचं नाव उंचावतील.” असं म्हणत अक्षयने देशवासियांना व्हिडीओ शेअर करत खेळाडूंचं प्रोस्ताहन वाढवण्यास सांगितलं आहे.

हे देखील वाचा: श्वेता तिवारीचा फिटनेस मंत्र; मायलेकीच्या वर्कआउटचा व्हिडीओ व्हायरल

देशाचा विजय हा देशवासियांच्याच हातात असल्याचं अक्षय या व्हिडीओत म्हणालाय.

दरम्यान अक्षय कुमार येत्या काळात अनेक सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिकांमधून झळकणार आहे. यातील त्याचा बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. याशिवाय तो बच्चन पांडे’, ‘राम सेतु’ , ‘बेल बॉटम’, ‘अतरंगी रे’ आणि ‘रक्षा बंधन’ या सिनेमातही झळकणार आहे.