06 March 2021

News Flash

आर्थिक संकटात अडकलेल्या अभिनेत्रीला केली अक्षय कुमारने मदत, रेणुका शहाणे म्हणाल्या…

काही दिवसांपूर्वी रेणुका शहाणे यांनी चाहत्यांना मदतीचे आवाहन केले होते.

लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात अडकलेल्या अभिनेत्री नुपूर अलंकारला मदत करण्यासाठी रेणुका शाहणे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना आवाहन केले होते. त्यांच्या या पोस्टनंतर बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने नुपूरला मदत केली आहे. आता रेणुका शहाणे यांनी ट्विट करत अक्षयचे आभार मानले आहेत.

रेणुका शहाणे यांनी ‘नुपूरचे पैसे पीएमसी बँकेत अडकले आहेत. आता पर्यंत ती तिच्या कमाईमधून आईचा उपचार करत होती. पण आता लॉकडाउनमुळे तिला पैसे मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे तुम्ही तिला जमेल त्या पद्धतीने आर्थिक मदत करा’ असे पोस्टमध्ये म्हणत चाहत्यांना मदतीचे आवाहन केले होते.

रेणुका शहाणे यांची ही पोस्ट पाहून अक्षय कुमारने नुपूरला मदत केली. म्हणून त्यांनी ट्विट करत अक्षय कुमारचे आभार मानले आहेत. ‘अक्षय कुमार मदत केल्याबद्दल तुझे खूप खूप आभार’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी नुपूर अलंकारने सोशल मीडियावर पोस्ट करत आईच्या उपचारासाठी चाहत्यांकडे मदत मागितली होती. त्यानंतर रेणुका शहाणे यांनी नुपूरला मदत करण्यासाठी पोस्ट लिहिली होती.

नुपूरने आता पर्यंत अनेक छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम केले आहे. तिन ‘अगले जनम मोहे बिटिया ही कीजो’, ‘घर की लक्ष्मी बेटियाँ’, ‘स्वरागिनी’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच या मालिकांमधील तिच्या भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंतीला उतरल्याचे पाहायला मिळाले होते.

यापूर्वी नूपुरला पीएमसी बँकमुळे आर्थिक फटका बसला होता. तिचे बँकेतील अकाऊंट फ्रिज झाल्यामुळे तिच्याकडे फारसे पैसे नव्हते, डेबिट कार्ड- क्रेडिट कार्डही ब्लॉक झाले होते. त्यामुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. म्हणून तिच्यावर दागिने विकण्याची वेळ आली होती. तिच्या मित्रमैत्रीणींनी देखील तिला मदत केल्याचे म्हटले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 7:44 pm

Web Title: akshay kumar comes to aid of actor nupur alankar facing financial crisis renuka shahane thanks avb 95
Next Stories
1 “बॉलिवूड हे कुटुंब नाही कल्पना आहे”; मीराच्या ‘त्या’ पोस्टवर अभिनेत्याचा टोला
2 ‘फक्त स्टार किड्स सोबत काम करतो’ धर्मा प्रोडक्शनने दिले होते आयुषमानला उत्तर
3 Video : सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवरुन नव्याने वाद
Just Now!
X