काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने लॉकडाउनमध्ये विशेष परवानगी घेऊन जाहिरातीचे चित्रीकरण केल्यामुळे चर्चेत होता. ही जाहीरात केंद्र सरकारच्या करोना विषयी जागरुकता मोहिम राबवण्यासाठी शूट करण्यात आली होती. आता ही जाहिरात प्रदर्शित करण्यात आली आहे.
या जाहिरातचे दिग्दर्शन अक्षय कुमारच्या ‘पॅड मॅन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आर. बाल्की यांनी केली आहे. तसेच जाहिरातीमध्ये अक्षय कुमारने घराबाहेर पडल्यानंतर करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी याची माहिती दिली आहे. पीआयबी इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ही जाहिरात प्रदर्शित करण्यात आली आहे.
Our battle with #COVID19 is not over, but we will not be afraid of the virus. We will take all precautions and we are going to move on with our lives
@akshaykumar @MoHFW_INDIA #IndiaFightsCorona #BreakTheStigma pic.twitter.com/EKxcwwhVb3
— PIB India (@PIB_India) June 2, 2020
जाहिरातीमध्ये अक्षय कुमार गावातील एक बबलू नावाच्या मुलाची भूमिका साकारताना दिसत आहे. जो लॉकडाउननंतर कामाला जायला मास्क लावून निघाला आहे. दरम्यान त्याला गावातील एक व्यक्ती लॉकडाउन संपताच फिरायला कुठे निघालास? असा प्रश्न विचारताना दिसत आहे. तसेच ते ही महामारी अजून संपलेली नाही असे ते अक्षयला बोलताना दिसतायेत.
त्यावर अक्षय कुमार आपण योग्य काळजी घेतली तर आपल्याला करोनाचा संसर्ग होणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण मास्क लावायला हवे. सारखे हात स्वच्छ धुवायला हवेत. त्याचबरोबर सोशल डिस्टंसिंगचे देखील पालन करायला हवे असे बोलताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी या जाहिरातीचे चित्रीकरण सुरु असतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच लॉकडाउनमध्ये चित्रीकरण केल्याने अक्षयला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 3, 2020 3:35 pm