01 October 2020

News Flash

अक्षय कुमारने नाशिक पोलिसांना दिले ५०० स्मार्टवॉच

मुंबई पोलिसांपाठोपाठ नाशिक पोलिसांचीही केली मदत

अक्षय कुमार

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार सातत्याने करोना योद्धांना मदत करत आहे. मुंबई पोलिसांसोबतच आता त्याने नाशिक पोलिसांसाठीही ५०० स्मार्टवॉच दिले आहेत. या स्मार्टवॉचद्वारे पोलिसांमध्ये करोनाची लक्षणे आढळल्यास मदत होईल. याआधी त्याने मुंबई पोलिसांना एक हजार असे स्मार्टवॉच दिले होते. नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या मदतीबद्दल अक्षयचे आभार मानले.

या मदतीविषयी विश्वास नांगरे पाटील म्हणाले, “मी अक्षय कुमार यांचे खूप आभार मानतो. ४५ किंवा त्याहून अधिक वय असलेल्या पोलिसांना हे स्मार्टवॉच दिले जातील. हे घड्याळ मनगटाला बांधल्यास शरीराचं तापमान, हृदयाचे ठोके आणि रक्तदाब यांचा डेटा कोविड डॅशबोर्डवर जमा केला जाईल. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याकडे नीट लक्ष देता देईल.”

आणखी वाचा : रुग्णालयाला मदत करून अभिनेत्री साजरा करणार अनोखा वाढदिवस 

हे स्मार्टवॉच भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध होईल. सर्वसामान्यांसाठी हे घड्याळ उपलब्ध करून देण्यापूर्वी करोनाच्या लढाईत अग्रस्थानी असणाऱ्या करोना योद्धांना ते तात्काळ पुरवण्यात येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 4:35 pm

Web Title: akshay kumar donates 500 smartwatches that can detect covid symptoms to nashik police ssv 92
Next Stories
1 “इंग्रजी न आल्यामुळे लोक मला गावठी म्हणायचे”; अभिनेत्रीने सांगितले संघर्षाचे किस्से
2 रुग्णालयाला मदत करून अभिनेत्री साजरा करणार वाढदिवस
3 अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर कुत्र्याने केला हल्ला; करावी लागली प्लास्टिक सर्जरी
Just Now!
X