News Flash

जबरा फॅन! अक्षय कुमारसाठी त्याने केला ९०० किमी पायी प्रवास

अक्षयने त्याच्या सोशल मीडियावर या चाहत्याचा व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

आपल्या आवडत्या बॉलिवूड अभिनेत्या भेटण्यासाठी चाहते कधी काय करतील याचा नेम नसतो. नुकताच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला भेटण्यासाठी त्याच्या चाहत्याने असाच काहीसा पराक्रम केला आहे. त्याने अक्षयच्या एका भेटीसाठी तब्बल ९०० किलोमीटरचा प्रवास पायी पार केला आहे.

अक्षय कुमारचा हा चाहता गुजरातमधील द्वारका शहरात राहणारा आहे. त्याने आपल्या आवडत्या अभिनेत्या भेटण्यासाठी द्वारका ते मुंबई चक्क ९०० किमीटरचा प्रवास पायी केला आहे. परबत असे या चाहत्याचे नाव असून अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर परबतचा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओ शेअर करत अक्षय कुमारने ‘आज माझी मुलाखत परबतशी झाली. तो मला भेटण्यासाठी ९०० किलोमीटर चालत द्वारकेहून आला आहे. त्याने हा १८ दिवसांचा प्रवास मला रविवारी भेटण्यासाठी केला आहे. आपल्या युवा पिढीने असे नियोजन आणि धैर्याने काम केले तर त्यांची स्वप्नपूर्ण होतील. मग त्यांना कुणीही अडवू शकत नाही’ असे कॅप्शनमध्ये लिहिले होते.

परबत हा द्वारका येथे राहणारा आहे. तो अक्षयचा खूप मोठा चाहता आहे. त्याने अक्षयला भेटण्यासाठी ९०० किलोमीटरचा प्रवास पायी केला आणि आज सकाळी तो अक्षय कुमारला त्याच्या निवासस्थानी जाऊन भेटला. आपल्यावरचे चाहत्यांचे प्रेम पाहून अक्षयला आनंदच झाला पण दुसरीकडे अक्षयने चाहत्यांना असे धाडस करु नका अशी विनंती देखील केली आहे.

‘मला तुम्हाला भेटल्यावर नेहमी आनंद होतो आणि तुमच्या या प्रेमासाठी मी कायम आभारी आहे. मात्र मी तुम्हाला विनंती करतो की असे काही करत जाऊ नका. तुमचा वेळ, तुमची ताकद तुमचे आयुष्य सुधारण्यासाठी वापरा. त्यातच माझा आनंद आहे. परबतला त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा’ असे दुसरे ट्विट अक्षय कुमारने केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 5:18 pm

Web Title: akshay kumar fan walk 900 km to meet akshay kumar avb 95
Next Stories
1 मिस इंडिया वर्ल्डवाइड श्री सैनीचे मुंबईत जल्लोषात स्वागत
2 दिशा पटानीसाठी ‘हा’ अभिनेता परफेक्ट; टायगरच्या बहिणीने सुचवले नाव
3 माझ्या जीवनावर एक चांगला चित्रपट होऊ शकतो- रानू मंडल
Just Now!
X