27 November 2020

News Flash

अक्षय कुमारने ठोकला ५०० कोटींचा मानहानीचा दावा

जाणून घ्या काय आहे प्रकरण

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने एका यूट्यूबरवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. या यूट्यूबरचे नाव राशिद सिद्दीकी असे असून, त्याने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात फेक व्हिडीओ शेअर केले होते. यामध्ये अक्षय कुमारवर रिया चक्रवर्तीला कॅनडाला जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप त्याने व्हिडीओद्वारे केला होता.

‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार चुकीची माहिती फसरवल्या प्रकरणी अक्षय कुमाराने यूट्यूबर विरोधात ५०० कोटींचा मानहानिचा दावा ठोकला आहे. यूट्यूबरने व्हिडीओमध्ये अक्षय कुमारवर रिया चक्रवर्तीला कॅनडा जाण्यास मदत केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नव्हे, तर अक्षय कुमारने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात गुपचूप महाराष्ट्र सरकारशी संवाद साधला असा देखील आरोप करण्यात आला आहे. अक्षय सुशांतला ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट मिळाल्याने खुश नसल्याचा दावा राशिदने व्हिडीओमध्ये केला आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचे नाव जबरदस्ती घेतल्याचा आरोप राशिदवर केलेला आहे. राशिदवर बदनामी, सार्वजनिक गैरव्यवहार आणि हेतुपुरस्सर अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या चार महिन्यांत युट्यूबवर राशिदने सुशांतचे फेक व्हिडीओ अपलोड करून तब्बल १५ लाख रुपयांवर कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला सुशांतच्या मृत्यूशी निगडीत अपलोड केलेल्या व्हिडीओ अधिकाधिक व्ह्यूज मिळत गेल्याने त्याने सप्टेंबर महिन्यात साडेसहा लाखांची कमाई केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 4:13 pm

Web Title: akshay kumar files rs 500 crore defamation case against a youtuber avb 95
Next Stories
1 ‘मॅगी’मध्ये मिळाली दोन मसाल्याची पाकिटं; ‘केबीसी’ जिंकलेल्या मोहिता यांचं ट्विट पाहून नेटकरी चक्रावले
2 ही दोस्ती तुटायची नाय; ‘ग्रॅव्हिटी’ सुपरहिट होताच अभिनेत्याने मित्रांमध्ये वाटले ७४ कोटी
3 Video : करीनाच्या ‘या’ वर्तणुकीमुळे करिष्मावर आली होती ट्रोल होण्याची वेळ
Just Now!
X