बॉलिवूडचा खिलाडी आणि बॉस अशी बिरुदावली मिरविणाऱ्या अक्षय कुमारच्या ‘गब्बर इज बॅक’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अक्षयचा हा ‘गब्बर’ त्याच्या चाहत्यांना फारच आवडत असल्याचे दिसत असून, त्यांना या चित्रपटाच्या चांगल्या कामगिरीची आशा लागून राहिली आहे. अॅक्शनने भरलेल्या या चित्रपटात अक्षय कुमार एक अतिशय सशक्त भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे, या चित्रपटात अक्षयने प्रसिद्ध हिंदी चित्रपटात ‘शोले’मधील गब्बर या खलनायकाचे नाव धारण केले असले, तरी तो हिरोची कामे करताना दिसणार आहे. अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या चित्रपटाच्या एका पोस्टरवरदेखील ‘नाम विलेन का काम हीरो का’ अशा ओळी नजरेस पडतात. २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रमना’ या तमीळ चित्रपटाचा हा रिमेक असून, चित्रपटात अक्षय कुमारबरोबर श्रुती हसन, सोनु सूद, प्रकाश राज यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर करिना कपूर आणि चित्रांगदा सिंह पाहुण्या-कलाकाराच्या भूमिकेत दिसतील.

Amitabh Bachchan look in Kalki 2898 AD
‘शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे!’ Kalki 2898 AD चा टीझर प्रदर्शित; ‘अश्वत्थामा’च्या दमदार भूमिकेत आहेत अमिताभ बच्चन
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर