09 August 2020

News Flash

अक्षयने पत्नीला दिलं सर्वात महागडं गिफ्ट, पाहा फोटो

हे गिफ्ट पाहून तुम्हालाही हसू येईल

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता सध्या त्याचा आगमी चित्रपट ‘गुड न्यूज’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तो चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘कपिल शर्मा’मध्ये पोहोचला होता. पण या एपिसोडचे चित्रीकरण पूर्ण करुन अक्षय कुमार घरी परतत असताता त्याने पत्नी ट्विंकल खन्नासाठी खास गिफ्ट घेतले आहे आणि विशेष म्हणजे हे गिफ्ट ट्विंकलला प्रचंड आवडले आहे.

ट्विंकलने अक्षयने दिलेल्या गिफ्टचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हे गिफ्ट म्हणजे कांद्याचे झुमके आहेत. हा फोटो शेअर करत तिने छान असे कॅप्शन दिले आहे. ‘माझा नवरा द कपिल शर्मा शोचे चित्रीकरण पूर्ण करुन घरी आला आणि मला म्हणाला, “ते लोकं हे करिनाला दाखवत होते, पण तिला ते फारसे आवडले नाहीत. मला माहित आहे हे तुला नक्की आवडतील म्हणून मी तुझ्यासाठी आणले आहेत” कधी कधी छोट्या गोष्टी तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणतात’ असे तिने कॅप्शन दिले आहे.

ट्विंकलने शेअर केलेले कांद्यांच्या झुमक्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. मागच्या काही दिवसांपासून देशभरात कांद्याचे वाढलेले भाव लोकांची डोकेदुखी ठरत आहेत. संसदे पासून ते सोशल मीडियापर्यंत सगळीकडेच कांद्याची चर्चा आहे. त्यामुळे अक्षयने त्याच्या बायकोला सर्वात महागडे गिफ्ट दिल्याचे म्हटले जात आहे.

पाहा फोटो : करिनाचं आलिशान सासर : ८०० कोटींचा पतौडी पॅलेस आतून कसा दिसतो पाहिलात का?

येत्या २७ डिसेंबरला अक्षयचा ‘गूड न्यूज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत करिना कपूर, कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्माती करण जोहरने केली असून काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2019 5:32 pm

Web Title: akshay kumar gave a onion earings to his wife as a gift avb 95
Next Stories
1 अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्या मुलीचे निधन
2 संजय लीला भन्साळींनी केली बालाकोट एअर स्ट्राइकवरील चित्रपटाची घोषणा, म्हणाले…
3 ‘या’ नेत्याचा साधेपणा पाहून चिन्मय मांडलेकरही क्षणभर थांबला, अन्…
Just Now!
X