बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल ४’ हा हिट चित्रपटांच्या यादीमधील एक आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तसेच चित्रपटातील गाण्यांनी तर अनेकांच्या मनावर जादूच केली होती. ‘बाला’ हे त्यापैकी एक गाणे. तसेच ‘बाला चॅलेंज’चा सोशल मीडियावर ट्रेंड सुरु होता. अभिनेता रवि दुबेने नुकताच त्याच्या घरातील एका लहान मुलीचा बाला हे गाणे गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनेता रवि दुबेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर त्याच्या घरातील एका लहान मुलाचा बाला हे गाणे गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच त्याने हा व्हिडीओ शेअर करत माझ्या घरातील ही लहान मुलगी अक्षय कुमारची खूप मोठी चाहती आहे. सर्वजण तिचे कौतुक करत आहेत या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
my tiny nephew is a biig fan of @akshaykumar sir Balaaaaaaaaaaa pic.twitter.com/T30x00Ndj6
— Ravi Dubey 1 (@_ravidubey) July 7, 2020
अक्षय कुमारला या चिमुकलीचा व्हिडीओ आवडला आहे. त्याने देखील या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने हा व्हिडीओ शेअर करत व्हिडीओमधील मुलगी क्यूट असल्याचे म्हटले आहे. तसेच नेटकऱ्यांनी देखील कमेंट करत छोट्या मुलीचे कौतुक केले आहे.
He’s got the lyrics bang on Too cute https://t.co/EtAcsxJ1Bu
— Akshay Kumar (@akshaykumar) July 7, 2020
‘हाऊसफुल’ या फ्रँचाइजीमधला ‘हाऊसफुल ४’ हा चौथा चित्रपट आहे. अक्षय कुमारसोबतच रितेश देशमुख, क्रिती सनॉन, बॉबी देओल, पूजा हेगडे आणि क्रिती खरबंदा अशी कलाकारांची फौज यामध्ये पाहायला मिळणार होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजीने केले होते. तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. चित्रपटातील बाला हे गाणे आजही प्रेक्षकांना प्रचंड आवडत असल्याचे दिसत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 3:26 pm