11 December 2017

News Flash

‘वन्स अपॉन टाईम इन मुंबई’ चित्रपटाच्या शुटींगसाठी अक्षय आणि इमरान एकत्र

मिलन लुथारीयाच्या २०११ साली आलेल्या 'वन्स अपॉन टाईम इन मुंबई' या चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर

मुंबई | Updated: February 15, 2013 3:47 AM

मिलन लुथारीयाच्या २०११ साली आलेल्या ‘वन्स अपॉन टाईम इन मुंबई’ या चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर चांगलेच यश मिळाले होते. असं असतानाही ‘वन्स अपॉन टाईम इन मुंबई’च्या पुढील भागात सर्व नवीन कलाकार घेण्यात आले आहेत. अक्षय कुमार, इमरान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांची यावेळी चित्रपटामध्ये वर्णी लागली आहे.
‘स्पेशल २६’ च्या यशानंतर भाव वधारलेल्या अक्षय कुमारने ब्रेक न घेता तो ‘वन्स अपॉन टाईम इन मुंबई’च्या चित्रिकरणात व्यस्त झाला आहे. नुकताच तो सहअभिनेता इमरान खानसोबत चित्रिकरण करताना दिसला.
पहिल्या भागाला मिळालेले यश पाहता चित्रपटाचा पुढील कसा असेल याची सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली असताना, अक्षय आणि इमरानही आपल्या भूमिकेवर विशेष मेहनत घेत असल्याचं चित्रिकरणादरम्यान त्यांच्या अविर्भावावरून दिसले.
एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चरतर्फे याची निर्मिती केली जात असून हा चित्रपट येत्या ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होईल.

First Published on February 15, 2013 3:47 am

Web Title: akshay kumar imran khan shoot for once upon a time in mumbaai again