09 March 2021

News Flash

खऱ्याखुऱ्या खिलाडीसोबत पडद्यावरचा खिलाडी; बेअर ग्रिल्ससोबत दिसणार अक्षय

नुकताचा शोच्या पुढच्या भागाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘Into The Wild’ हा शो अतिशय लोकप्रिय आहे. बेअर ग्रिल्स सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत देखील झळकले होते. आता बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार देखील शोमध्ये हजेरी लावणार आहे.

नुकताच अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ‘Into The Wild’ च्या आगामी भागाचा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत त्याने ‘तुम्हाला असे वाटत असेल की मी वेडा आहे… पण केवळ वेडे लोकच जंगलात जात असतात’ असे म्हटले आहे. पण अक्षय सहभागी झालेला हा भाग कधी प्रदर्शित होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

‘Into The Wild’ या शोमध्ये सहभागी होणारा अक्षय कुमार तिसरा भारतीय आहे. सर्वात पहिले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोमध्ये हजेरी लावली होती. त्यानंतर सुपरस्टार रजनीकांत हे सहभागी झाले. कर्नाटकातील बंदिपूर राष्ट्रीय उद्यानात रजनीकांत यांचा ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या शोमधील एपिसोडचे चित्रीकरण करण्यात आला होता. आता अक्षय कुमार कोणत्या जंगलात जाणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 6:03 pm

Web Title: akshay kumar into the wild with bear grylls avb 95
Next Stories
1 Video : गुरूजींशिवाय बाप्पाची प्राणप्रतिष्ठा कशी करायची?, मग पुष्कर श्रोत्रीचा हा व्हिडीओ पाहा
2 अनु- सिद्धार्थला कुटुंबीय देणारं ‘हे’ खास सरप्राइज
3 झी टॉकीजच्या विशेष चित्रपट महोत्सवात ‘या रे या सा रे या’
Just Now!
X