News Flash

मुलीसाठी अक्षय कुमारने केला ‘हा’ चित्रपट

चित्रपटातून केवळ मनोरंजन न करता त्यातून समाजाला सामाजिक संदेश देता यावा याकडे सध्या अक्षयचा कल आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या निवडक चित्रपटांमुळे चाहत्यांच्या मनात घर केले आहे. प्रत्येक चित्रपटात अक्षय कुमार एका वेगळ्या भूमिकेत दिसतो. त्यामुळे चाहत्यांना अक्षयच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता असते. आता अक्षयने त्याच्या एका चित्रपटाची निवड त्याच्या मुलीसाठी केल्याचा खुलासा सोशल मीडियावर केला आहे.

अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘मिशन मंगल’ चित्रपटाशी संबंधीत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने अशा प्रकारच्या चित्रपटात काम करण्याची इच्छा केव्हापासून असल्याचे त्याने सांगितले आहे. ‘मिशन मंगल’ हा एक असा चित्रपट आहे ज्याने येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळेल. दरम्यान ‘मिशन मंगल’ या चित्रपटाची निवड त्याने मुलीसाठी केली असल्याचे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

‘मी या चित्रपटाची निवड माझ्या मुलीसाठी आणि तिच्यासारख्या इतर लहान मुलांसाठी करत आहे. जेणकरुन त्यांना भारतातील मिशल मंगलबद्दल माहिती होईल’ असे अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

‘मिशन मंगल’ हा चित्रपट फॉक्स स्टार स्टुडिओ आणि केप ऑफ गुड फिल्म मिळून करणार आहेत. तसेच हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू आणि सोनाक्षी सिन्हा दिसणार आहेत.

गेल्या काही वर्षात अक्षयने अॅक्शनपटाऐवजी सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटांना पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे. चित्रपटातून केवळ मनोरंजन न करता त्यातून समाजाला सामाजिक संदेश देता यावाकडे अक्षयचा कल असल्याचे यातून एकंदरीत दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 1:26 pm

Web Title: akshay kumar is doing mission mangal movie for her daughter avb 95
Next Stories
1 साहोमधील ‘सायको सैय्या’ गाण्यात प्रभास-श्रद्धाची भन्नाट केमिस्ट्री
2 पूजा हेगडेचा हा फोटो झाला व्हायरल
3 सहकलाकाराला हृदयविकाराचा झटका, सलमान घेतोय काळजी
Just Now!
X