02 March 2021

News Flash

अक्षयच्या बहुप्रतिक्षित ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर प्रदर्शित

हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित हॉरर कॉमेडी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सध्या सोशल मीडियावर चित्रपटाबाबत चर्चा सुरु आहेत.

अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. ३ मिनिटे ४० सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार एक वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. तो गर्लफ्रेंड कियारा अडवाणीच्या कुटुंबीयांना भेटायला आलेला असतो. पण तेथे आल्यानंतर एक ट्रान्सजेंडर भूत अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवतो. त्यानंतर अक्षयचे वागणे बोलणे पूर्णपणे बदलले असल्याचे ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. अक्षयला या वेगळ्या भूमिकेत पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे.

‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत अक्षयने ‘लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचा ऑफिशिअल ट्रेलर. तुम्ही जेथे कुठे आहात तेथे थांबा आणि लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर पाहण्यासाठी तयार व्हा. कारण लक्ष्मी तुमच्या भेटीला येत आहे’ असे कॅप्शन दिले आहे.

येत्या दिवाळीमध्ये लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या दिवशी हा चित्रपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएई या देशातही प्रदर्शित करण्यात येणार आहे. तर भारतीय प्रेक्षकांना हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टावर पाहता येणार आहे. तसेच अमेरिका आणि कॅनडामधील प्रेक्षकांसाठी हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. राघवा लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2020 1:16 pm

Web Title: akshay kumar laxmi bomb movie trailer is out avb 95
Next Stories
1 प्रभास-दीपिकाच्या चित्रपटात बिग बींची एण्ट्री
2 ठरलं तर! सारा आणि वरुण धनवचा ‘कूली नं. १’ या दिवशी होणार प्रदर्शित
3 Confirm : नेहा कक्कर करणार ‘या’ गायकाशी लग्न
Just Now!
X