24 September 2020

News Flash

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ या तारखेला होणार प्रदर्शित

अक्षयने जाहीर केली प्रदर्शनाची तारीख

अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या प्रदर्शनाची तारीख अखेर ठरली आहे. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयने नुकतंच ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. येत्या ९ नोव्हेंबर रोजी ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा आगळ्या वेगळ्या विषयाचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

‘या दिवाळीला तुमच्या घरी लक्ष्मीसोबतच धमाकेदार बॉम्बसुद्धा येईल’, असं म्हणत अक्षयने प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. ९ नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील अक्षयच्या भूमिकेविषयी फार उत्सुकता आहे. कारण तो एका ट्रान्सजेंडर भूताची भूमिका साकारत असून त्याचा लूकसुद्धा लक्षवेधी आहे.

‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. यामध्ये अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. राघव लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटाचे हक्क १२५ कोटी रुपयांना विकल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शनापुर्वीच मालामाल झाल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 3:50 pm

Web Title: akshay kumar laxmmi bomb to release on 9th november on disney plus hotstar ssv 92
Next Stories
1 ‘शिवीगाळ करायची असेल तर मला कर पण कृपया…’; स्वरा भास्करची कंगनाला विनंती
2 ‘तू मला सोडून गेलास तर…’; सुझानच्या ‘त्या’ पोस्टवर हृतिकची कमेंट
3 “सुशांतच्या नावाखाली मिळणारी प्रसिद्धी नकोय”
Just Now!
X