22 March 2019

News Flash

Video : अक्षयकुमार आजही ‘या’ गाण्यावरुन घेतो सैफची फिरकी

अक्षय या गाण्याला मास्टर पीस म्हणतो.

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यातचं उदाहरण द्यायचं झालं तर अभिनेता सैफ अली खान आणि अक्षयकुमार. आजवर हे दोघ अनेक चित्रपटांमध्ये एकत्र झळकले असून त्यांच्यातील घनिष्ठ मैत्री असल्याचं सांगण्यात येतं. ‘मै खिलाडी तू अनाडी’,’ तू चोर मैं सिपाही’, ‘ए दिललगी’, ‘आरजू’, ‘ताश’, ‘किमत’ या सारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी स्क्रिन शेअर केली आहे. या चित्रपटांव्यतिरिक्त ‘आशिक आवारा’ चित्रपटामध्येही सैफ झळकला आहे. मात्र या चित्रपटातील एका गाण्यामुळे अक्षयकुमार आजही त्याची फिरकी घेतल असल्याचं सैफने नुकतंच सांगितलं आहे.

९० च्या दशकामध्ये सैफने ‘आशिक आवारा’ या चित्रपटामध्ये ‘मैं हूं आशिक’ या गाण्यावर डान्स केला होता. हे गाणं त्याकाळी प्रचंड गाजलं होतं. मात्र या गाण्यामुळे अक्षयने त्याला चांगलंच चिडवल्याचं सैफने एका मुलाखतीमध्ये सांगितलं.

‘मैं हूं आशिक गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अक्षयने मला फोन केला आणि काही बोलण्यापेक्षा सलग हसायला लागला. त्याच्या हसण्याचा अर्थ मला अजिबात समजला नाही. मात्र त्यानेच नंतर हसण्यामागचं कारण स्पष्ट केलं. अरे तु या गाण्यात नक्की काय करत आहे ? असा प्रश्न अक्षयने मला विचारला आणि परत हसायला लागलं. हा मुद्दा इथेच संपत नाही तर आज या गाण्याला प्रदर्शित होऊन इतकी वर्ष लोटली तरी सुद्धा तो या गाण्याची आठवण काढून मला हसतो’, असं सैफ म्हणाला.

पुढे तो असंही म्हणाला, ‘अक्षय या गाण्याला मास्टर पीस म्हणतो. काही दिवसापूर्वी आमची भेट झाली होती. तेव्हा देखील तो मला हसत होता’.
सैफने सांगितलेल्या या आठवणीमधून त्यांची मैत्री किती खोल आणि घनिष्ठ आहे हे समजतं. व्यस्त शेड्युलमुळे जरी या दोघांची भेट होत नसली तरी त्यांनी त्यांची मैत्री कायम ठेवली आहे. सध्या सैफ त्याच्या ‘सिक्रेड गेम’ या वेबसीरिजमुळे चर्चेचा विषय ठरला आहे.

 

First Published on August 11, 2018 10:07 am

Web Title: akshay kumar made fun of saif ali khan aashik aawara song