अभिनेता अक्षय कुमार सध्या चांगलाच चर्चेत आहे. कायमच त्याने चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे. यावर्षी अक्षयचे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. येत्या १५ ऑगस्टला अक्षयचा ‘मिशन मंगल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘सूर्यवंशी’, ‘गुड न्यूज’ आणि ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटांमध्येही अक्षय झळकणार आहे.

अक्षय लवकरच एक नवीन चित्रपट घेऊन येणार आहे. ‘मिशन मंगल’मध्ये दिग्दर्शक जगन शक्तिसोबत काम केल्यानंतर आता अक्षय ‘इक्का’ हा नवीन चित्रपट घेऊन येणार आहे. ए आर मुरुगदास यांचा तमिळ चित्रपट ‘कत्थी’चा हा रिमेक आहे. या चित्रपटात अक्षय कुमार डबल रोलमध्ये दिसणार आहे.

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
bade miyan chote miyan Vs maidan
अजय देवगण की अक्षय कुमार, कोणाच्या चित्रपटाने केली ग्रँड ओपनिंग? दोन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन….
nach ga ghuma teaser launch mukta barve and namrata sambherao
नम्रता संभेराव अन् मुक्ता बर्वेची अनोखी जुगलबंदी! ‘नाच गं घुमा’चा टीझर प्रदर्शित, छोट्या मायराने वेधलं लक्ष

जगन शक्ति ‘मिशन मंगल’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. ‘चीनी कम’, ‘पा’, ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘थुपक्की’ आणि ‘हॉलिडे’ या चित्रपटांसाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. त्याने सांगितले की, “सध्या या चित्रपटाच्या संहितेवर काम सुरु आहे.” ‘कत्थी’ या मूळ चित्रपटातून शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर भाष्य करण्यात आले होते.

दरम्यान, ‘मिशन मंगल’ चित्रपटामध्ये अक्षयने राकेश धवन ही भूमिका साकारली असून तो या मोहिमेचे नेतृत्व करताना दिसत आहे. त्याच्याव्यतिरिक्त या टीम तारा शिंदे (विद्या बालन), कृतिका अग्रवाल (तापसी पन्नू), एका गांधी (सोनाक्षी सिन्हा), शर्मन जोशी (परमेश्वर नायडू), नेहा सिद्दिकी (कृति कुल्हारी) नजर हे कलाकार झळकणार आहेत. मंगळ मोहिमेची योजना आखण्यापासून ती यशस्वी करण्यापर्यंतचा प्रवास या सिनेमात दाखविण्यात आला आहे.