‘फोर्ब्स’ मासिकाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील कलाकारांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत फक्त एकमेव भारतीय अभिनेता आहे. तो म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार. अक्षय या यादीत ३३व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षभरात अक्षयने ६५ मिलियन डॉलर (सुमारे ४४४ कोटी रुपये) इतकी कमाई केली आहे. कमाईच्या बाबतीत अक्षयने रिहाना, जॅकी चैन, ब्रॅडली कूपर, स्कारलेट जॉनसन यांसारख्या कलाकारांनाही मागे टाकलं आहे.

अक्षय कुमारच्या हाती सध्या ‘हाऊसफुल ४’, ‘मिशन मंगल’, ‘सूर्यवंशी’, ‘गुड न्यूज’, ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे बरेच चित्रपट आहेत. इतर २० वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिरातीसुद्धा तो करतोय.

आणखी वाचा : ‘नेटफ्लिक्स’ म्हणजे काय ठाऊक नसतानाही जितेंद्रला मिळाली काटेकरची भूमिका

‘फोर्ब्स’च्या या यादीत अमेरिकन गायिका टेलर स्विफ्ट अग्रस्थानी आहे. गेल्या वर्षभरात तिने तब्बल १२६४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे टेलर स्विफ्ट २०१६ पासून या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तिच्यानंतर मॉडेल काइली जेनर दुसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट तिसऱ्या, अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू लियोन मेसी चौथ्या तर ब्रिटीश गायक एड शीरन पाचव्या क्रमांकावर आहे.