News Flash

Photo: अक्षय कुमार जेव्हा केपटाऊनमध्ये मासेमारी करतो

त्याच्या खांद्यावर टीना नाव लिहिलेला टॅटूही फार आकर्षक दिसत आहे

Photo: अक्षय कुमार जेव्हा केपटाऊनमध्ये मासेमारी करतो
अक्षय कुमार

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार सध्या आपल्या कुटुंबासोबत केपटाउनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याच दरम्यानचे काही फोटो त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अक्षय एका कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे. त्याच्या खांद्यावर टीना नाव लिहिलेला टॅटूही फार आकर्षक दिसत आहे. ट्विंकल खन्नाचे टोपण नाव आहे.

कुत्र्यासोबतचा फोटो शेअर करताना अक्षयने लिहिले की, या चांगल्या मुलासोबत दक्षिण आफ्रिकेच्या उन्हाचा आनंद घेत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तो ट्विंकलसोबत मासेमारी करताना दिसत आहे. पुढच्या वर्षी २६ जानेवारीला त्याचा ‘पॅडमॅन’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अक्षयसोबत सोनम कपूर आणि राधिका आपटे यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आर. बाल्कि दिग्दर्शित हा सिनेमा पॅडमॅन अरुणाचलम मुरुगानाथम यांच्या जीवनावर आधारित आहे.

काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. २ मिनिट २५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये अक्षय महिलांना सॅनिटरी पॅडचे महत्त्व समजावताना दिसत आहे. अरुणाचलम मुरुगनाथम यांनी ग्रामीण भागातील महिलांनी पाळीच्या दिवसांमध्ये वापरायचे सॅनिटरी पॅड वापरावेत, यासाठी चळवळ सुरू केली होती. सिनेमात अक्षय कुमार अरूणाचलम मरुगनाथम यांची भूमिका साकारत आहे. अक्षय गावातील महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन तयार करण्याचे यंत्र तयार करतो, असे दाखवण्यात आले आहे. या यंत्रामुळे गावातील स्त्रियांना स्वस्तात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याचा त्याचा हेतू असतो. मात्र, अक्षयच्या या कामाला त्याच्या पत्नीसकट सगळ्यांचाच विरोध असतो.

गावातील प्रत्येक व्यक्ती त्याची थट्टा करत असते. मासिक पाळीवेळी महिला कपड्याचा वापर करतात. कपड्याच्या वापरामुळे त्या आजारीही पडतात, त्यामुळे अक्षय त्यांच्यासाठी सॅनीटरी नॅपकिन बनवायला सुरूवात करतो. ट्रेलरमध्ये अक्षय सॅनिटरी नॅपकीन बनवून मुलींना वाटताना दिसतो. पण त्याच्या या कृतीमुळे मुली त्याच्यापासून दूर पळतात. स्वतः अक्षय सॅनिटरी नॅपकीन वापरुन पाहतो. आपला नवरा सॅनिटरी नॅपकीन बनवतो या गोष्टीची लाज वाटून अरुणाचलम यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती. सिनेमात राधिका आपटेने त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2017 4:59 am

Web Title: akshay kumar posted a cute picture soaking up some south african sun with his good boy and twinkle khanna from cape town
Next Stories
1 जेव्हा सारा तेंडुलकरही एकदा वापरलेला ड्रेस पुन्हा वापरते
2 फ्लॅशबॅक : ‘पांडू हवालदार’मधील सखाराम
3 या तारखेला प्रदर्शित होणार ‘हॉस्टेल डेज’
Just Now!
X