News Flash

‘भाग मिल्खा भाग’ नाकारल्याचा अक्षयला होतोय पश्चाताप

मिल्खा सिंग यांच्या बायोपिकसाठी अक्षयच्या नावाचा विचार करण्यात करण्यात आला होता.

अभिनेता अक्षय कुमार हा बॉलिवूडमधल्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून ओळखला जातो. पॅडमॅन, एअर लिफ्ट, रुस्तम , टॉयलेट एक प्रेमकथा, केसरी यांसारखे अनेक यशस्वी चित्रपट अक्षयनं दिले. हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. अॅक्शन हिरो म्हणून प्रसिद्ध असलेला अक्षय आता सामाजिक विषयांकडे वळला आहे. दोन दशकांहून अधिकची सुपरहिट कारकीर्द असलेल्या अक्षयला मात्र एक चित्रपट नाकारल्याचा पश्चाताप होत आहे, हा चित्रपट म्हणजेच ‘भाग मिल्खा भाग’ होय.

मिल्खा सिंग यांच्या बायोपिकसाठी अक्षयच्या नावाचा विचार करण्यात करण्यात आला होता. ‘फ्लाईंग शीख’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिल्खा सिंग यांची भूमिका नंतर फरहान अख्तरनं साकरली . अक्षय त्यावेळी ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ या चित्रपटात काम करत होता. या चित्रपटासाठीच अक्षयनं ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटाला नकार दिला. मात्र या निर्णयाचा आता  खूपच पश्चाताप होत असल्याचं अक्षयनं एका कार्यक्रमात मान्य केलं. अक्षयच्या नकारानंतर फरहानची वर्णी मिल्खा सिंग यांच्या भूमिकेसाठी लागली. फरहाननं या संधीचं सोनं केलं. या चित्रपटासाठी फरहानला अनेक पुरस्कार मिळाले.

गेल्याच महिन्यात  अक्षयचा ‘केसरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बक्कळ कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. अक्षयचा  ‘हाऊसफुल ४’ हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 1:43 pm

Web Title: akshay kumar regrets turning bhaag milkha bhaag movie offer
Next Stories
1 जवान बिष्णू श्रेष्ठा यांच्या जीवनावर येणार बायोपिक
2 Video : वडिलांच्या तब्येतीविषयी रणबीरने व्यक्त केली काळजी; आलिया झाली भावूक
3 अॅमी जॅक्सन गर्भवती; अब्जाधीश प्रियकराशी जानेवारीत केला होता साखरपुडा
Just Now!
X