News Flash

अक्षय कुमार घरी परतला, पत्नी ट्विंकल म्हणते, “त्याला परत आसपास पाहून…”

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारला करोनाची लागण झाल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते.

काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारला करोनाची लागण झाली होती. त्यामुळे तो दवाखान्यात उपचार घेत होता. उपचार पूर्ण करुन आता तो घरी परतला आहे. त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हिने याबद्दल पोस्ट करत माहिती दिली आहे.

अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री, लेखिका ट्विंकल खन्ना हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. तिचा आणि अक्षयचा हा अॅनिमेटेड फोटो आहे. या फोटोला तिने कॅप्शनही दिलं आहे. यात ती म्हणते, “सुरक्षित आणि व्यवस्थित, त्याला पुन्हा आसपास पाहून बरं वाटत आहे.” अक्षय आणि ट्विंकल हे घरात असल्याचं या फोटोवरुन कळत आहे. अशा पद्धतीने ट्विंकलने अक्षय दवाखान्यातून घरी परतल्याचं जाहीर केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

गेल्या आठवड्यात ट्विंकलने जगातल्या अनिश्चिततेवर भाष्य करणारी एक कविता लिहिली होती. यातून तिने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ट्विंकलने महाराष्ट्रातल्या संचारबंदीवरही भाष्य केलं होतं. तिने बीचवरचा एक व्हिडिओ शेअर करत लिहिलं होतं, “आता बीच कुत्र्यांकडे आहे आणि आपल्याकडे आपले विकेंड्स. सुरक्षित रहा.”

या महिन्याच्या सुरुवातीला अभिनेता अक्षय कुमारला करोनाची लागण झाली होती. त्याने सोशल मीडियावरुन याबद्दल माहितीही दिली होती. अक्षय ‘रामसेतू’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत होता. त्याच्यासोबतच त्याच्या सेटवरचे ४५ जण करोनाबाधित असल्याचीही माहिती मिळाली होती. ते सर्वजण विलगीकरणात असून उपचार घेत असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळेच या चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं होतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 3:29 pm

Web Title: akshay kumar returned to home from hospital twinkle khanna shared news vsk 98
Next Stories
1 रणवीर पुन्हा एकदा मराठी तरुणाच्या भूमिकेत, इंटरनेटवर धुमाकुळ!
2 वहीदा रहमान यांनी वयालाही लाजवलं, ८३ व्या वर्षी केलं water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल
3 ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण; अभिषेक बच्चन म्हणाला तिला माहितेय..
Just Now!
X