News Flash

आ रही है पुलिस! या दिवशी अक्षयचा ‘सूर्यवंशी’ होणार चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित

जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित...

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि अक्षय कुमार ही जोडी बऱ्याच वर्षांनंतर एकत्र झळकणार आहे. या चित्रपटात ही जोडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख समोर आली आहे.

अक्षयने ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचा एक टीझर ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत त्याने ‘आम्ही वचन दिल्या प्रमाणे तुम्हाला चित्रपटगृहांमध्ये भेटणार आहोत… आता ती वेळ आली आहे. आ रही है पुलिस! सूर्यवंशी हा चित्रपट जगभरात ३० एप्रिल २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे’ असे म्हटले आहे.

अक्षयने शेअर केलेल्या टीझरमध्ये सुरुवातीला सूर्यवंशी चित्रपटाचा ट्रेलर २ मार्च २०२०मध्ये लाँच करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. पण आम्ही प्रेक्षकांना वचन दिले होते की योग्य वेळ येताच सूर्यवंशी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार. जवळपास एक वर्ष उलटले आहे. आता सूर्यवंशी हा चित्रपट जगभरात चित्रपटगृहांमध्ये ३० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

रोहित शेट्टी, ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून या चित्रपटामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त अभिनेता रणवीर सिंग, अजय देवगण, कतरिना कैफ आणि जॅकी श्रॉफ हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2021 10:33 am

Web Title: akshay kumar rohit shetty suryavanshi release date launched avb 95
Next Stories
1 ‘पेन्शन’साठी झगडताना!
2 पुन्हा ‘कोण होणार करोडपती’…
3 ‘पार्श्वगायन इतिहाजसमा’
Just Now!
X