News Flash

अक्षयचा निमरतसोबत रोमॅण्टिक अंदाज, ‘एअरलिफ्ट’मधील ‘सोच ना सके’ गाणे प्रदर्शित

प्रसिद्ध गायक अरिजित सिंग याने हे गाणं गायलं आहे

'तू कभी सोच ना सके', असे या गाण्याचे बोल असून, अक्षय कुमार आणि अभिनेत्री निमरत कौरचा रोमॅण्टीक अंदाज गाण्यात पाहायला मिळतो

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्या ‘एअरलिफ्ट’ या आगामी चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘तू कभी सोच ना सके’, असे या गाण्याचे बोल असून, अक्षय कुमार आणि अभिनेत्री निमरत कौरचा रोमॅण्टिक अंदाज गाण्यात पाहायला मिळतो. प्रसिद्ध गायक अरिजित सिंग याने हे गाणं गायलं आहे. युट्यूबवर गाण्याला चांगली पसंती देखील मिळत आहे. त्यामुळे अरिजित सिंगच्या हिट गाण्यांच्या लिस्टमध्ये हे गाणं देखील समाविष्ट होईल असा अंदाज गाण्याला मिळणाऱया पसंतीनुसार नक्कीच बांधता येईल.
‘एअरलिफ्ट’ हा चित्रपट जानेवारीत प्रदर्शित होणार असून, चित्रपटात अक्षय कुमार कुवेतस्थित भारतीय उद्योजकाची भूमिका साकारत आहे. चित्रपट ९० च्या दशकात घेऊन जाणारा असून नामवंत उद्योजक असूनही कुवेतमध्ये त्यावेळी निर्माण झालेले युद्ध प्रसंग, तेथील भारतीयांची झालेली ससेहोलपट आणि त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी भारताने केलेले प्रयत्न याचा थरार चित्रपटातून अनुभवता येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 2:31 pm

Web Title: akshay kumar romances nimrat kaur in airlift song soch
Next Stories
1 ‘धूम ४’ लवकरचं येतोय; यशराजने प्रसिद्ध केला व्हिडिओ
2 ऑस्कर नामांकनांच्या यादीत ‘हेमलकसा’
3 फ्लॅशबॅक: मराठी चित्रपटसृष्टीतील ती एकी…
Just Now!
X