News Flash

‘शाहरुख, सलमान आणि आमिर नाही तर मीच राहणार नंबर वन’, अक्षय म्हणाला…

एका मुलाखतीत अक्षयने हे वक्तव्य केले होते...

अभिनेता अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षय त्याच्या फिटनेस आणि स्टंट्समुळे ओळखला जातो. ३० वर्षे चित्रपटसृष्टीतल्या प्रवासात अक्षयने चढ-उतार हे पाहिलेच आहेत. अक्षय नेहमीच कोणत्या ना कोणच्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. शाहरूख खान, सलमान खान आणि आमिर खान पेक्षा तो जास्त वेळ टिकून राहिलं असे वक्तव्य अक्षयने केले होते, त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या ५ व्या पर्वात अक्षयने हजेरी लावली होती. “कोणता लोकप्रिय अभिनेता लोकप्रियतेच्या शर्यतीत शेवट पर्यंत टिकून राहिल? असा प्रश्न करणने अक्षयला विचारला. त्यासोबत करणने त्याला ४ ऑप्शन देखील दिले. सलमान खान, शाहरूख खान, आमिर खान आणि तू म्हणजेच अक्षय कुमार.” त्याला उत्तर देत अक्षय म्हणाला, “जर शाहरूख, सलमान आणि आमिरने धुम्रपान करणे थांबवले तर ते राहतील नाही तर शेवटपर्यंत मी राहिलं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

यानंतर आमिरने अक्षयच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. “मी धुम्रपान करण्यास सुरूवात केली याचा मला आनंद नाही, परंतू माझ्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जशी जवळ येते तसा मी चिंताग्रस्त होतो आणि मी धुम्रपान करण्यास सुरूवात करतो.”

पुढे आमिर म्हणाला, “मला असे वाटत नाही की धूम्रपान केल्याने कोणाच्याही अभिनय कौशल्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो, याच्यामुळे आपण अशक्त होऊ शकतो आणि आपल्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो. मी सर्वांना धूम्रपान न करण्याची विनंती करतो आणि मी सुद्धा यावर माझं नियंत्रण ठेवत आहे.” धूम्रपान करणे आरोग्यास हानिकारक आहे.

दरम्यान, अक्षयच्या सुर्यवंशी या चित्रपटाकी तारीख गेल्या वर्षभरापासून करोनामुळे पुढे ढकलली जातं आहे. अक्षयला करोनाची लागण झाल्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटांचे चित्रीकरण हे थांबले आहे. तर आमिरचा लाल सिंग चढ्ढा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 3:24 pm

Web Title: akshay kumar said he will last longer in industry than shah rukh khan aamir khan and salman khan dcp 98
Next Stories
1 गर्दीचे सीन, गाण्यांच्या चित्रीकरणावर निर्बंध; ‘हे’ असतील चित्रपटसृष्टीसाठीचे नवे नियम
2 ‘थर्ड क्लास अभिनय…’, द बिग बुल प्रदर्शित होताच अभिषेक बच्चन झाला ट्रोल
3 राहुल वैद्य आणि दिशाची नवी सुरुवात, चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा
Just Now!
X