News Flash

‘प्रियांकालाच विचारु तिला माझ्यापासून काय अडचण आहे’

मी आणि प्रियांकाने आतापर्यंत पाच सिनेमात काम केले आहे

अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘जॉली एलएलबी २’ च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनमध्ये फिरत असताना तो रजत शर्मा यांचा कार्यक्रम आप की अदालतमध्येही गेला होता. तिथे त्याला अनेक कठीण प्रश्नांचा सामना करावा लागला होता. असे असले तरी त्याने अगदी सहजरित्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. आंतरराष्ट्रीय अभिनेत्री बनलेली प्रियांका चोप्राबद्दलही त्याला यावेळी प्रश्न विचारण्यात आले.

अक्षयला विचारण्यात आले की, तो का प्रियांका चोप्रासोबत काम करु शकत नाही? यावर उत्तर देताना अक्षय म्हणाला की, असं काही नाहीये. मी आणि प्रियांकाने आतापर्यंत पाच सिनेमात काम केले आहे. असंही काही नाहीये की मी तिच्यासोबत काम करु इच्छित नाही. राणी मुखर्जीला सोडून मी सगळ्याच अभिनेत्रींबरोबर काम केले आहे. जर मला पुन्हा एकदा प्रियांका चोप्रासोबत काम करण्याची संधी मिळाली तर पुन्हा एकदा तिच्यासोबत काम करायला नक्की आवडेल.

यानंतर अक्षयला विचारण्यात आले की, त्याला एकता कपूर आणि फराह खान यांच्यासोबत काम करण्यासही काही अडचण आहे का? या प्रश्नावर हसत अक्षय म्हणाला की, चला आपण प्रियांका चोप्रा, एकता कपूर आणि फराह खान यांना एकत्र बोलवू आणि त्यांनाच विचारु की त्यांना माझ्यापासून काय अडचण आहे.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी २’ या आगामी सिनेमाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायलयाने या सिनेमा विरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या सिनेमात वकिलांची किंवा न्यायाधीशांची बदनामी करण्यात आली आहे असा आरोप या सिनेमावर करण्यात आला होता.

तसेच अजय कुमार वाघमारे नावाच्या एका वकिलाने उच्च न्यायालयात या सिनेमा विरोधात याचिका दाखल करत म्हटले होते की, या सिनेमाच्या नावातून एलएलबी हा शब्द वगळण्यात यावा तसेच न्यायालयात वकील पत्ते खेळताना दाखवण्यात आले असल्याचे दृश्यही वगळण्यात यावे अशी मागणी त्याने केली होती. याचिकेत हेही सांगण्यात आले होते की कायद्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबत काही प्रतिबंधनही आहेत.

याचिकेनुसार या सिनेमात न्यायालयाशी निगडीत लोकांचे विनोदी चित्रण करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औंरगाबादच्या खंडपीठाने ‘जॉलीएलएलबी २’ हा सिनेमा प्रदर्शनापूर्वी पाहण्यासाठी दोन अमायकस क्युरीची (न्याय मित्र) नियुक्ती केली होती. त्यामुळे अजूनही या सिनेमाच्या प्रदर्शनावर टांगती तलवारच आहे असे म्हणावे लागेल. कारय याचा अंतिम निर्णय ३ फेब्रुवारीला होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 6:09 pm

Web Title: akshay kumar said lets call priyanka chopra to ask if she has issues with me
Next Stories
1 फिल्मफेअरच्या प्रकरणावरून सोनमने केली भावाची पाठराखण
2 ‘वेडिंग अॅनिवर्सरी’मध्ये जगाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याचा सल्ला देताना दिसतील नाना पाटेकर
3 कृतिका कामराचा ‘चंद्रकांता’मधील पहिला लूक
Just Now!
X