अभिनेता अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून त्याचा आगामी ‘राम सेतू’ या सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमाच्या शूटिंगचा श्रीगणेशा करण्यासाठी अक्षय कुमार अयोध्येला रवाना झालाय. अक्षय कुमारसोबतच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, नुसरत भरुचा या दोघीदेखील अयोध्येला गेल्या आहेत. तिथे गेल्यावर सगळ्यात आधी संपूर्ण टीमने काय केले याचा फोटो अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अक्षयने ट्विटरवर ट्विट करत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत श्री रामांची आरती सुरू असल्याचे दिसत आहे. “आज श्री अयोध्येत ‘राम सेतु’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करण्याआधी भगवान श्री रामाचा आशीर्वाद मिळाला. जय श्री राम!” अशा आशयाचे कॅप्शन अक्षयने त्या फोटोला दिले आहे.

या चित्रपटात अक्षयसोबत जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरुचा या दोघी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. भारतीय संस्कृती आणि परंपरा, भारताचं प्राचीन काळातलं महत्त्व, भारताचा समृद्ध वारसा यावर भाष्य करणारा हा सिनेमा असणार आहे.