News Flash

या गोष्टीमुळे मुलीने दिला होता अक्षय कुमारला नकार

खुद्द अक्षय कुमारने हा खुलासा केला आहे

विनोदवीर कपिल शर्मा आणि त्याचे सहकारी ‘कपिल शर्मा शो’च्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत. या शोमध्ये येणारे कलाकार हे शोला आणखी रंजक करतात. नुकताच द कपिल शर्मा शोमध्ये ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाची टीम अभिनेता अक्षय कुमार, चंकी पांडे, क्रिती सनॉन, पूजा हेगडे, क्रिती खरबंदा, बॉबी देओल आणि रितेश देशमुख यांनी हजेरी लावली. सर्वच कलाकारांनी कपिल शर्मासोबत शोमध्ये धमाल केली. मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते अक्षय कुमारने.

शोमध्ये अक्षय कुमारने प्रेक्षकांशी संवाद साधला. तेव्हा त्याने एक किस्सा सांगितला. ‘सुरुवातीला मला अनेक मुलींनी रिजेक्ट केले होते. तसेच माझ्यासोबत डेटवर येण्यासही नकार दिला होता’ असा खुलासा अक्षयने केला. त्यानंतर अक्षयने मुली त्याला का नकार देत असत याचे कारण देखील सांगितले आहे.

‘लहानपणापासून मी खूप लाजाळू होतो. मी एका मुलीला डेट करत होतो. तिला घेऊन मी बऱ्याच वेळा फिरायला जात असे. पण त्या मुलीला माझा हात पकडून रोमॅन्टिक अंदाजात फिरायचे होते आणि हे करताना मला लाज वाटायची. त्यामुळे एक दिवस त्या मुलीने माझ्यासोबत डेटवर येण्यास नकार दिला’ असे अक्षय म्हणाला. ते ऐकून सर्वत्र हास्याची लाट पसरली.

आणखी वाचा : …म्हणून कपिल शर्मा शोमधून कृष्णाला काढण्यात आलं होतं बाजूला

‘हाऊसफुल’ या फ्रँचाइजीमधला ‘हाऊसफुल ४’ हा चौथा चित्रपट आहे. अक्षय कुमारसोबतच रितेश देशमुख, क्रिती सनॉन, बॉबी देओल, पूजा हेगडे आणि क्रिती खरबंदा अशी कलाकारांची फौज यामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजीने केले आहे. दिग्दर्शक साजिद खानवर #MeToo मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर फरहादकडे दिग्दर्शन सोपवले गेले. दिवाळीच्या मुहूर्तावर, २६ ऑक्टोबर रोजी हा कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2019 1:54 pm

Web Title: akshay kumar says that so many times he get rejected by girls avb 95
Next Stories
1 बलात्कार प्रकरणी दिग्दर्शकाला कोलकात्यातून अटक
2 एक्सपर्टमुळे केबीसी स्पर्धकाला सोडावा लागला गेम
3 ही मॉडेल ठरली जगातील सर्वात सुंदर महिला
Just Now!
X