News Flash

अक्षयच्या पदरात तीन मोठे चित्रपट, ‘मिशन मंगल’मध्ये प्रमुख भूमिकेत

चित्रपटातून केवळ मनोरंजन न करता त्यातून सामाजिक संदेशही प्रेक्षकांपर्यंत जाईल यावर अक्षयचा भर राहिला आहे.

अक्षय कुमार

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची तीन बिग बजेट चित्रपटासाठी वर्णी लागली आहे. ‘फॉक्स स्टार स्टुडिओ’समवेत अक्षयनं तीन चित्रपटांचा करार केला आहे. पहिला चित्रपट हा मिशन मंगल असून फॉक्स स्टार स्टुडिओ आणि केप ऑफ गुड फिल्म मिळून पहिल्या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. नोव्हेंबरच्या पुढील आठवड्यापासून या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सुरूवात होत आहे. आर बाल्की आणि जगन शक्ती हे दोन दिग्दर्शक सर्वात महत्त्वाच्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.

चित्रपटातून केवळ मनोरंजन न करता त्यातून सामाजिक संदेशही प्रेक्षकांपर्यंत जाईल यावर अक्षयचा भर राहिला आहे. गेल्या काही वर्षांत अॅक्शनपटऐवजी अक्षयची पसंती ही सामाजिक विषयांवरील चित्रपटांना मिळत आहे. म्हणूनच या तीन चित्रपटात महत्त्वाचा संदेश असेल असंही म्हटलं जातं आहे. ‘अक्षयनं चित्रपटाचा ट्रेंड पूर्णपणे बदलला आहे. सामाजिक विषयावरील चित्रपटांकडे अक्षयनं प्रेक्षकांना खेचून आणलं आहे, त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अक्षयसोबत काम करणं हा वेगळा अनुभव असणार आहे यासाठी आम्ही उत्सुक आहोत , अशी प्रतिक्रिया फॉक्स आणि केप ऑफ गुड फिल्मनं दिली आहे. पुढील वर्षांत २.०, हेराफेरी ३, केसरी, हाऊसफुल असे चार मोठे चित्रपट अक्षयचे येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 4:42 pm

Web Title: akshay kumar signs 3 film deal with fox star studios
Next Stories
1 आयुषमानला खास दिवाळी भेट; ‘बधाई हो’ १०० कोटी पार
2 Video : ‘गॅटमॅट’ मधील रसिकाचं ‘हे’ गाणं ठरतंय सुपरहिट
3 इरफान खान नाशिकमध्ये करणार दिवाळी साजरी
Just Now!
X