03 June 2020

News Flash

अक्षय कुमारने विद्या बालनच्या लगावली कानाखाली, जाणून घ्या कारण

सोनाक्षी विद्याच्या प्रत्युत्तराची प्रशंसा करत आहे

बहूचर्चित आणि बहूप्रतिक्षीत ‘मिशन मंगल’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार, विद्या बालन आणि सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे कलाकरांनी जोरदार प्रमोशनही केले होते. नुकताच अक्षय कुमार आणि विद्या बालनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार विद्या बालनच्या कानाखाली लगावताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार आणि विद्या बालन भांडण्याचे नाटक करत आहेत. अक्षय कुमार मस्तीमध्ये विद्या बालनला मारताना दिसत आहे. विद्यादेखील त्यावर अक्षयला चांगले उत्तर देते. दरम्यान व्हिडीओमध्ये येत असलेल्या आवाजावरुन हा व्हिडीओ सोनाक्षी सिन्हाने शूट केला असल्याचे म्हटले जात आहे. सोनाक्षी विद्याच्या प्रत्युत्तराची प्रशंसा करत आहे. अक्षय आणि विद्याचा हा व्हिडीओ पाहून कोणालाही हे भांडण खरे वाटेल.

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ हा चित्रपट भारताच्या ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अक्षयने राकेश धवन ही भूमिका साकारली असून तो ‘मिशन मंगल’ या मोहिमेचे नेतृत्व करताना दिसत आहे. त्याच्या व्यतिरिक्त विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी, कृति कुल्हारी हे कलाकार झळकणार आहेत. मंगळयान मोहिमेतील प्रमुख वैज्ञानिक राकेश धवन आणि त्यांचे सहकारी तारा शिंदे, एका गांधी, कृतिका अग्रवाल, वर्षां गावडा, नेहा सिद्दीकी, परमेश्वर नायडू, अनंत आयर आदी वैज्ञानिकांना हा चित्रपट म्हणजे एक मानवंदना आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2019 5:40 pm

Web Title: akshay kumar slap vidya balan video viral on internet avb 95
Next Stories
1 Batla House Movie Review : दमदार संवाद, अभिनयासह देशातील सर्वांत चर्चित एन्काऊंटरची कहाणी
2 ‘शोले’ बद्दल या रंजक गोष्टी माहितीयेत का?
3 Independence day: पाकिस्तानी नेटकऱ्यांना अदनान सामीने दिली सडेतोड उत्तरं, म्हणाला…
Just Now!
X