X

VIDEO : जॉन सीनाही म्हणतो ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

खिलाडी कुमार नेहमीच चौकटीबाहेरील काही चित्रपटांनाच प्राधान्य देतो. त्यामुळे त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्येही कमालीची उत्सुकता पाहायला मिळते. अशाच उत्साही वातावरणात काही दिवसांपूर्वी त्याचा ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरपासून ते प्रत्येक गाण्यामध्ये अक्षयचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला होता. गावच्या ठिकाणी शौचालयांअभावी काय परिस्थिती उदभवते, सर्वसामान्यांना त्याचा नेमका कसा त्रास होतो याची मांडणी या चित्रपटातून करण्यात आली होती.

‘स्वच्छ भारत अभियाना’चा मुद्दाही या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आला होता. श्री नारायण सिंग दिग्दर्शित या चित्रपटाने प्रेक्षकांचीही चांगली दाद मिळवली होती. अशा या चित्रपटाचा स्पूफ ट्रेलर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीसुद्धा असे बरेच ‘स्पूफ’ ट्रेलर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. पण, हा ट्रेलर सर्वाधिक गाजण्याचं कारण म्हणजे ‘डब्ल्यू डब्ल्यू ई’ सुपरस्टार जॉन सीना. झालात ना तुम्हीही थक्क? जॉन आणि खिलाडी कुमारच्या ‘टॉयलेट- एक प्रेमकथा’चं कथाचं काय कनेक्शन, हाच प्रश्न बहुधा अनेकांच्या मनात घर करुन गेला असेल.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

‘दानिश सिद्दीकी वाईन्स’ या युट्यूब चॅनलवर ‘टॉयलेट…’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. ज्यामध्ये जॉन सीना, निकी बेलाही झळकले आहेत. या व्हिडिओमध्ये ‘टॉयलेट…’च्या ट्रेलरमधील संवाद आणि पार्श्वसंगीत तसंच असून, दृश्यांमध्ये मात्र ‘डब्ल्यू डब्ल्यू ई’चा एकंदर माहोल पाहायला मिळत आहे. ज्या कलात्मकतेने हा संवाद आणि दृश्यांचं मिश्रण करण्यात आलं आहे ते प्रशंसनीय आहे. मुख्य म्हणजे ‘स्पूफ’ व्हिडिओंच्या ट्रेंडची चलती असल्यामुळे सध्या हा व्हिडिओ बराच चर्चेत आहे.

First Published on: October 6, 2017 5:03 pm
वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain