छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो.’ या शोमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या आगामी चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी येताना दिसतात. दरम्यान शोचा सूत्रसंचालक कपिल शर्मा आणि आलेल्या कलाकारांमधील मजामस्ती पाहायला प्रेक्षकांना आवडते. कधीकधी कलाकार त्यांच्या खासगी आयुष्यातील देखील काही गोष्टी कपिलसोबत शेअर करताना दिसतात. एकदा शोमध्ये अक्षय कुमारने हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने एका मुलीला डेट करतानाचा किस्सा सांगितला आहे.

सध्या सोशल मीडियावर ‘द कपिल शर्मा’ शो मधील अक्षय कुमारचा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ‘हाऊसफूल ४’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे. या व्हिडीओमध्ये अक्षयसोबत अभिनेता रितेश देशमुख असल्याचे दिसत आहे. शोमध्ये कपिल अक्षयला प्रश्न विचारतो की ‘अक्षय तुला एखाद्या मुलीने काही कारण देत नकार दिला आहे का?’ त्यावर अक्षय कुमारने पहिल्यांदाच एका मुलीला डेट करतानाचा किस्सा सांगितला आहे.

आणखी वाचा : “तुला अंतर्वस्त्र पाठवते” म्हणणाऱ्याला अनुषा दांडेकरचं सडेतोड उत्तर; म्हणाली…

‘मी थोडा लाजाळू स्वभावाचा आहे आणि त्या मुलीला वाटत होते मी तिच्या खांद्यावर हात ठेवावा, तिला किस करावे. पण मी हे करु शकलो नाही. नंतर ती मला सोडून निघून गेली’ असे अक्षय कुमार म्हणाला. अक्षयने दिलेले उत्तर ऐकून तेथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना हसू अनावर झाले.

अक्षयचे उत्तर ऐकून रितेश म्हणाला, ‘मला सांगा, या कहाणीवर कोण विश्वास ठेवणार?’ रितेशचे बोलणे ऐकून सर्वांना हसू अनावर झाले. ‘द कपिल शर्मा शो’ फेब्रुवारी महिन्यापासून बंद आहे. सध्या शो चे चित्रीकरण सुरु असून मे महिन्यात शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे. पण शोमधील काही व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाले आहे.