07 March 2021

News Flash

शेवटी अक्षय कुमारने अंगावर कोरले ‘तिचे’ नाव

तेच नाव त्याने टॅटू कोरण्यासाठी निवडले यात नवल नाही

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचे आपल्या कुटुंबावर किती प्रेम आहे हे काही नव्याने सांगायला नको. आपल्या व्यस्त कारभारातूनही तो आपल्या कुटुंबासाठी वेळ काढायला विसरत नाही. अक्षय कुमारचा सोशल मीडियावर नुकताच एक फोटो व्हायरल झाला आहे. यात त्याच्या खांद्यावर पत्नीच्या नावाचा टॅटू कोरलेला दिसतो. ‘टिना’ नावाचा हा टॅटू अगदी साधा पण तरीही आकर्षक असा आहे. ट्विंकल खन्नाला तिच्या जवळचे लोक टिना या नावाने हाक मारतात. स्वतः अक्षयही तिला याच नावाने संबोधतो. अर्थात तेच नाव त्याने टॅटू कोरण्यासाठी निवडले यात काही नवल नाही. अक्षयच्या पाठीवरही मुलाच्या ‘आरव’ नावाचा एक टॅटू या आधीच कोरला होता. अक्षय आणि ट्विंकलचे २००१ मध्ये लग्न झाले होते. दोघांना आरव आणि नितारा ही दोन मुलेही आहेत. अक्षयच्या आधी सैफअली खानने करिना कपूर खानच्या नावाचा टॅटू हातावर कोरला होता.
काही दिवसांपूर्वीच अक्षयने त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा केला. अक्षय सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘जॉलीएलएलबी’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. न्यायालयीन व्यवस्थेवर चुरचुरीत भाष्य करणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘जॉली एलएलबी’ सिनेमाचा हा सिक्वेल आहे. २०१३ मध्ये ‘जॉली एलएलबी’ सिनेमाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला होता. सिनेमावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. तसेच सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. ‘जॉली एलएलबी’मध्ये अभिनेता अर्शद वारसी हा मुख्य भूमिकेत होता, मात्र सिक्वेलमध्ये अर्शदऐवजी यंदा अक्षय कुमारचा समावेश करण्यात आला आहे. ‘जॉली एलएलबी’मधील अभिनेते सौरभ शुक्ला मात्र सिक्वेलमध्येही दिसणार आहेत. ‘जॉली एलएलबी २’ मध्ये अक्षय कुमारसोबत हुमा कुरेशीचीही प्रमुख भूमिका आहे. नुकतेच या सिनेमाचे लखनऊमधील शुटिंग संपले.

aksahay-486x550

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 8:00 pm

Web Title: akshay kumar tattoo of wife twinkles
Next Stories
1 एका क्षणात बदलला धोनीचा चेहरा
2 बहुचर्चित ‘पार्श’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
3 मुलीच्या प्रियकरासाठी सरसावला अनिल कपूर
Just Now!
X