News Flash

सलमान, करणच्या चित्रपटात अक्षय कुमारची वर्णी

हा चित्रपट पुढच्या वर्षी नक्की प्रदर्शित होईल याची खात्री करणने दिली आहे.

एका चित्रपटासाठी सलमान खान आणि करण जोहर हे एकत्र आले असून यात बॉलीवूडचा 'खिलाडी' म्हणजेच अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

बॉलीवूडचा दिग्दर्शक, निर्माता करण जोहरला ब-याच काळापासून सलमान खानसोबत काम करण्याची इच्छा होती. करणच्या ‘शुद्धी’ या चित्रपटात ‘दबंग’ खानची एण्ट्री झाली होती. मात्र, बरीच चर्चा होऊनही काही कारणास्तव हा चित्रपट बनला नाही. पण, करण आणि सलमानच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. एका चित्रपटासाठी सलमान खान आणि करण जोहर हे एकत्र आले असून यात बॉलीवूडचा ‘खिलाडी’ म्हणजेच अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

करण जोहरने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउन्टवरून यासंबंधीचे वृत्त दिले. करणने ट्विट केलेय की, सलमान खानसोबत चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. अनुराग सिंग दिग्दर्शित चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसेल. हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित होईल. मात्र, करणने चित्रपटाचे शीर्षक सांगितलेले नाही. पण, हा चित्रपट पुढच्या वर्षी नक्की प्रदर्शित होईल याची खात्री करणने दिली आहे. सलमान खानच्या निर्मिती अंतर्गत बनणा-या या चित्रपटाची सहनिर्मिती करण करणार आहे.

सलमान खान आणि अक्षय कुमार यांनीही चित्रपटाबाबत ट्विट करून करणच्या ट्विटला दुजोरा दिला. सलमानने ट्विट केलेय की, करणची सहनिर्मिती आणि अक्षयची मुख्य भूमिका असलेल्या एका प्रोजेक्टसाठी हातमिळवणी केली. या ट्विटसोबत सलमानने त्याच्या बिइंग इन टच अॅपची लिंकही शेअर केली आहे. तर अक्षयने ट्विट केलेय की, माझ्या मित्रांची संयुक्त निर्मिती असणा-या चित्रपटात मी काम करणार आहे. २०१८ मध्ये चित्रपट प्रदर्शित होईल.

याआधी सलमान खान आणि अक्षय कुमारने ‘मुझसे शादी करोगी’, ‘जान-ए-मन’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. तर करण जोहरचे बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण असलेल्या ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात सलमानने काम केले होते. सलमान खानच्या निर्मिती संस्थेने याआधी ‘चिल्लर पार्टी’, ‘डॉ कॅबी’, ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘हिरो’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 8:39 am

Web Title: akshay kumar to star in a 2018 movie co produced by salman khan karan johar
Next Stories
1 हिंदी सिनेमांची अश्लील गाणी सुधारण्याची मोहीम
2 मुंबईसारखे सुरक्षित आमच्याकडेही वाटावे!
3 जानेवारी महिन्यात होणार या चित्रपटांचा ‘बोभाटा’..
Just Now!
X