News Flash

अक्षय-ट्विंकलच्या लेकीचा ‘सुपर हिरो’ लूक

हातोडा उचलण्याची शक्ती असताना बिचारी राजकुमारी कशाला बनायचे?

अक्षय कुमार आणि ट्विंकलची मुलगी नितारा

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना बॉलिवूडनंतर सध्या लेखिका म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करताना दिसते. अक्कीसोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर ट्विंकलने बॉलिवूडकडे जणू पाठच फिरवली आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमात ती चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विंकल कुटुंबियासोबतचे आनंदी क्षण इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर नेहमीच शेअर करते. नेहमीच्या सवयीप्रमाणे ट्विंकलने नुकताच आपल्या मुलीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपल्या लेकीचा सुपर हिरो अवतारच तिने या फोटोतून दाखवून देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. अक्षय आणि ट्विंकल यांच्या चाहत्यांमध्ये निताराच्या फोटोला देखील चांगलीच लोकप्रियता मिळत असते. ट्विंकलने शेअर केलेल्या फोटोमध्ये नितारा सुपर हिरो थॉरच्या पोशाखात दिसत आहे. निताराच्या हातामध्ये हातोडाही दिसते. हातोडा उचलण्याची शक्ती असताना बिचारी राजकुमारी कशाला बनायचे, अशा आशयाचे कॅप्शन ट्विंकलने फोटोला दिले आहे.

सोशल मीडियावर मुलगी निताराचा फोटो शेअर करण्याची ट्विंकलची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील ट्विंकलने लेकीचे अनेक फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळाले आहे. यापूर्वी निताराच्या अंगी असणारी कला दाखविणारा एक फोटो ट्विंकलने शेअर केला होता. ज्या फोटोमध्ये नितारा चित्ररंगविताना दिसली होती. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा १६ वा वाढदिवस साजरा केला. ट्विंकलने याबाबत एक ट्विटही केले होते. पण या ट्विटमध्ये इतरांसारखे प्रेमाचे संदेश नव्हते तर एकमेकांना मारण्याचा प्रयत्न फसल्याचे दुःख व्यक्त केले होते. मैत्री, प्रेम, लग्न आणि कुटुंब याचे उत्तम उदाहरण देण्यासाठी नेहमीच हे जोडपे आदर्श असेल. एकाहून एक उत्तम सिनेमे देताना तो संहितेवरही तेवढेच लक्ष देतो. तर दुसरीकडे ट्विंकल खन्ना नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी आणि ट्विटसाठी प्रसिद्ध असते.

अक्षयच्या चित्रपटाविषयी बोलायचे तर  २०१७ मध्ये ‘जॉली एलएलबी २’ आणि ‘२.०’ हे सिक्वलपटातून अक्षय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  याशिवाय ‘पॅड मॅन’ आणि ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्येही तो सध्या व्यग्र आहे. लवकरच तो ‘गोल्ड’ या चित्रपटातही दिसणार आहे. ‘गोल्ड’ हा चित्रपट भारतीय हॉकीपटू बलबीर सिंग यांच्या जीवनावर आधारित आहे. बलबीरने १९४८, १९५२ आणि १९५६ मध्ये भारतीय संघाला सुवर्ण पदकाची कमाई केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 7:56 pm

Web Title: akshay kumar twinkle khanna daughter nitara kumar is an avenger look
Next Stories
1 ‘मंटो’ सिनेमातला नवाजुद्दीनचा फर्स्ट लूक प्रदर्शित
2 हिंमत असेल तर पैगंबर मोहम्मदवर सिनेमा बनवून दाखवाः अनू कपूर
3 सिद्धार्थसाठी जॅकलिन बनली पोल डान्सर
Just Now!
X