बॉलीवूडच्या दुनियेतला नवा बॉस अक्षय कुमारने टक्कर दिलीये थेट करोडोंच्या हृदयावर राज्य करणाऱया ‘डान्स व संगीत स्टार’ मायकल जॅक्सनला.
अक्षय कुमारने मायकल जॅक्सनचा विक्रम मोडला आहे. ‘डान्सिंग सुपरस्टार’ मायकल जॅक्सनच्या एका पोस्टरने सर्वात भव्य पोस्टर म्हणून ‘गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदविले होते. पण आता अक्षय कुमारच्या चाहत्यांनी हा विक्रम मोडायचे ठरविले आणि मायकल जॅक्सनच्या पोस्टरपेक्षा मोठा पोस्टर तयार केला आहे. हा पोस्टर आहे अक्षयच्या बॉस या चित्रपटाचा. हे पोस्टर ५८.८७ मीटर रुंद आणि ५४.९४ मीटर उंच असून आता गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.