News Flash

नितारामुळे अक्षय कुमारच्या चित्रपटाला झाला फायदा

सुभाष कपूर दिग्दर्शित हा चित्रपट १० फेब्रुवारी २०१७ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अक्षय कुमार

२०१६ मध्ये विविध चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात अभिनेता अक्षय कुमारला यश मिळाले होते. खिलाडी कुमारच्या आगामी चित्रपटांबद्दल नेहमीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. अशीच उत्सुकता सध्या त्याच्या आगामी ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाबद्दलही पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे आता या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. खिलाडी कुमार सध्या त्याच्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाबद्दलच्या विविध चर्चाही चित्रपट वर्तुळात रंगत आहेत. त्यातीलच एका चर्चेने सध्या अनेकांचे लक्ष वेधले आहे. ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटातील एका गाण्यासाठी अक्षयच्या मुलीकडून म्हणजेच निताराकडून प्रेरणा मिळाली असल्याचे वृत्त जनसत्ता आणि इतर काही संकेतस्थळांनी प्रसिद्ध केले आहे.

झाले असे की, ‘एका रात्री अक्षय त्याच्या मुलीसोबत म्हणजेच नितारासोबत खेळत होता. त्यावेळी नितारा एक गाणे गुणगुणत होती. त्यानंतर अक्षयच्या डोक्यात लगेचच एक कल्पना आली की, त्याच्या आगामी चित्रपटातील एका गाण्यासाठी नितारा गात असलेल्या त्या चालीचा वापर करता येऊ शकतो’. अक्षयला ही कल्पना येताच त्याने चित्रपटाच्या निर्मात्यांसोबतच चर्चा केली आणि बऱ्याच चर्चांनंतर या चित्रपटातील गाण्याची चाल तयार झाली. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये या गाण्याचे चित्रिकरण पार पडले असून अभिनेत्री हुमा कुरेशी आणि खिलाडी कुमार यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, सुभाष कपूर दिग्दर्शित हा चित्रपट १० फेब्रुवारी २०१७ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयचा हा आगामी चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटाचा सिक्वल आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून खिलाडी कुमार त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या चित्रपटाबाबतचे विविध फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत आहे. जॉली एलएलबी २- हा चित्रपट ‘जॉली एलएलबी’चा सिक्वल आहे. अक्षय कुमार, हुमा कुरेशी आणि अनू कपूर यात मुख्य भूमिका साकारतील. त्यामुळे येत्या काळात अक्षयचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी होतो का…हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 3:18 pm

Web Title: akshay kumar upcoming court room drama one track is inspired by daughter nitara rhyme
Next Stories
1 खेळाडूच्या संघर्षाची कहाणी सांगणारा ‘वलय’
2 जाणून घ्या, मलायकाने अरबाजकडून पोटगीत १० कोटी मागण्याचे सत्य..
3 आमिरसाठी ‘सैराट’ जोडी पुन्हा एकत्र
Just Now!
X