25 November 2020

News Flash

प्रदर्शनापूर्वीच अक्षयच्या चित्रपटाचा विक्रम, शुटिंगसाठी उभारले तब्बल ३५ भव्यदिव्य सेट्स

या चित्रपटात अक्षय कुमारसह मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत दिसणार आहे

यश राज फिल्म बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘पृथ्वीराज’ असे असणार आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि ‘मिस वर्ल्ड २०१७’चा किताब पटकावणारी मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पृथ्वीराज खऱ्या अर्थाने वायआरएफचा पहिला ऐतिहासिक चित्रपट असणार आहे आणि त्याला अविस्मरणीय बनवण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी कोणतीही कमी ठेवलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार या ऐतिहासिक चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तब्बल 35 विलोभस सेट्स निर्माण केले जाणार आहेत. या आधी बॉलिवुड चित्रपटासाठी कधीही इतके सेट्स उभारण्यात आले नव्हते.

“अगदी नावापासूनच हा चित्रपट भव्यदिव्य आहे. अक्षय आणि मानुषीच्या या ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण 35 वेगवेगळ्या सेट्सवर केले जाणार आहे. ज्यापैकी बहुतांश सेट्स महाराष्ट्रात तर काही राजस्थानमध्ये उभे करण्यात आले आहेत. निर्माते या चित्रपटाला मनोरंजक आणि दर्शनीय बनवण्यासाठी थोडं हटके काम करत आहेत. त्यामुळे हे सेट्स पाहिल्याक्षणीच प्रेक्षकांना भव्य दृश्यांचा नजराणा मिळणार आहे” असे चित्रपट निर्मितीला अगदी जवळून पाहणाऱ्या सूत्राने सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

Keepin’ it

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar) on

“चित्रपटामध्ये अदभूत लढाईचे सिक्वेंस आहेत. त्याच बरोबर त्या काळातील राजे आणि राज्यांची समृध्दी दाखवण्यात येणार आहे. हजारो कारागिर अहोरात्र काम करुन हे महाकाय सेट्स निर्माण करत आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी 35 सेट्सची निर्मिती खरोखर एक रेकॉर्ड आहे. यामुळे पृथ्वीराजच्या अनुषंघाने प्रेक्षकांना मिळणाऱ्या नेत्रसुखाचा आपण थेट अंदाज लावू शकतो” असे सूत्राने पुढे म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 6:00 pm

Web Title: akshay kumar upcoming historical movie producer create 35 sets avb 95
Next Stories
1 ‘राधे’च्या चित्रीकरणादरम्यान रणवीर हुडा जखमी
2 जॅकलिनला बनायचं होतं नन, पण झाली अभिनेत्री; कारण….
3 पानिपत: अहमद शाह अब्दालीसाठी गोवारीकरांनी संजय दत्तच का निवडला?
Just Now!
X