31 October 2020

News Flash

पाहा: अक्षय कुमारचा ‘क्रो लूक’; २.० मध्ये खलनायकी भूमिकेत

अक्षयचा हा लूक सध्या व्हायरल झाला आहे.

Akshay Kumar villainous crow look : अक्षय या चित्रपटात कावळ्यामध्ये रूपांतरित झालेल्या डॉ. रिचर्डची भूमिका साकारत आहे.

रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘२.०’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार साकारत असलेल्या खलनायकी व्यक्तिरेखेचा लूक प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमार पहिल्यांदाच पहिल्यांदाच पडद्यावर खलनायकाची व्यक्तिरेखा साकारत असून ‘२.०’ मधील त्याचा ‘क्रो लूक’ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. अक्षयचा हा मेकओव्हर त्याच्या चाहत्यांसाठी एकप्रकारचा धक्काच आहे. यामध्ये अक्षय कुमार डोळ्यांच्या लांब भुवया, पांढरे केस आणि काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अक्षय या चित्रपटात कावळ्यामध्ये रूपांतरित झालेल्या डॉ. रिचर्डची भूमिका साकारत आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षयच्या या लूकबद्दल पूर्णपणे गुप्तता बाळगण्यात आली होती. मात्र, आता अक्षयनेच ट्विटरवरून हा लूक शेअर केला आहे. ‘२.०’ हा रजनीकांत यांच्या ‘एथिरन’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2016 11:04 am

Web Title: akshay kumar villainous crow look from rajinikanth revealed see pics
Next Stories
1 जॅकी चेनच्या ‘कुंग फू योगा’साठी फराह खानचे नृत्यदिग्दर्शन
2 राहुल महाजन पुन्हा बोहल्यावर, कोल्हापूरच्या अमृतासोबत लगीनगाठ
3 आजी-आजोबांनी दिलेल्या वाढदिवसाच्या ‘त्या’ भेटीने आलियाला रडू कोसळले
Just Now!
X