News Flash

अक्षयच्या ‘एन्टरटेन्मेंट’चा प्रिमियर लंडनमध्ये

अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा आणि यो यो हनी सिंग हे आगामी ‘एन्टरटेन्मेंट’ चित्रपटाच्या प्रिमियरकरिता ८ ऑगस्टला लंडन येथे उपस्थित राहणार आहेत.

| August 5, 2014 02:10 am

अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा आणि यो यो हनी सिंग हे आगामी ‘एन्टरटेन्मेंट’ चित्रपटाच्या प्रिमियरकरिता ८ ऑगस्टला लंडन येथे उपस्थित राहणार आहेत.
‘द वेव्ह वर्ल्ड कबड्डी लीग’ (वेव्ह डब्ल्यूकेएल) या पहिल्या आंतरराष्ट्रीय कबड्डी लीगद्वारे ‘एन्टरटेन्मेंट’चा प्रिमियर ठेवण्यात आला आहे. या प्रिमियरला अभिनेत्री तमन्ना भाटीयाही उपस्थित राहणार आहे.
चित्रपटात महत्त्वाची भूमिका निभावणा-या कुत्र्याच्या नावावरून चित्रपटाचे शिर्षक ठेवण्यात आले आहे. चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय प्रिमियरकरिता उत्सुक असलेला अक्षय म्हणाला की, माझ्या चाहत्यांना मी केलेल्या विनोदी भूमिका नेहमीच आवडत आल्या आहेत. ‘एन्टटेन्मेंट’ चित्रपटाच्या प्रीमिअरची घोषणा करताना मला आनंद होत आहे. वेव्ह डब्ल्यूकेएलने चित्रपटाच्या प्रिमियरचे संचालन केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच, अक्षयने खालसा वॉरियर या त्याच्या कबड्डी संघाचे समर्थन करण्याचेही चाहत्यांना आवाहन केले. दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असलेल्या साजिद-फरहादच्या या चित्रपटाची निर्मिती रमेश एस तौरानी आणि जयंतीलाल गाडा यांनी केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2014 2:10 am

Web Title: akshay kumars entertainment to premiere in london
Next Stories
1 …आपलं घर नाही सोडणार श्रद्धा!
2 CELEBRITY BLOG : ऑगस्ट… मधले ऑगस्ट… अलीकडचे ऑगस्ट!
3 राजेश खन्ना यांचे मृत्यूपत्र अनिता अडवानींना देण्याला स्थगिती
Just Now!
X