बॉलिूवडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री हुमा कुरेशी सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. हा चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र प्रमोशनवेळी अक्की ज्या ज्या ठिकाणी त्याच्या चाहत्यांना भेटला त्यावेळी त्याला सलमान खान लग्न कधी करणार याची विचारणा करण्यात आली. आता अक्कीला सलमान खानच्या लग्नाबद्दल का विचारले हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच निर्माण होऊ शकतो. याच कारण असे आहे की, चित्रपटातील एका सीनमध्ये अक्षय कुमारने त्याच्या आगामी चित्रपटामध्ये सलमानच्या लग्नाचा मुद्दा उपस्थित केला आहे. ‘जॉली एलएलबी २’ या अक्कीच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बॉलिवूडचा सुलतान सलमान खान यांच्या नावाचा उल्लेख केल्याचे दिसून आले आहे. ट्रेलरला तर प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिलाच मात्र अक्कीने चित्रपटातील कोर्टात सलमानच्या लग्नावर विचारलेला प्रश्न प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला आहे. त्यामुळेच  सलमान लग्न कधी करणार ? असा प्रश्न अक्षय कुमारला प्रमोशनवेळी विचारण्यात येत आहे.

सलमान खानच्या लग्नाच्या प्रश्नावर अक्कीने मात्र मौन बाळगले आहे. सलमानच्या लग्नाचा विषय म्हणजे बॉलिवूडमधील सर्वात चर्चचा विषय आहे. अक्कीच्या चित्रपटातील संवादामुळे सलमानच्या लग्नाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे दिसते. सलमान आणि अक्षय दोघांच्या एकत्रित चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटामध्ये ही जोडी एकत्र दिसली होती. या चित्रपटामध्ये प्रियांकाने सलमान आणि अक्कीसोबत स्क्रिन शेअर केली होती. या चित्रपटाचे कथानक देखील सलमानच्या लग्नाभोवतीच फिरताना दिसले होते. सलमान खान आणि प्रियांका यांच्या प्रेमात अक्षय कुमार शनीसारखा आल्याचे दाखविण्यात आले होते. अर्थात अक्षयची चित्रपटातील ही धडपड  सलमानच्या लग्नासाठी होती, हे चित्रपटाच्या शेवटी लक्षात आले होते. या चित्रपटात सलमानला लग्नासाठी तयार करणाऱ्या अक्षयला आता आपल्या चित्रपटातील संवादामुळे सलमानच्या लग्नाचा मुहूर्ताची विचारणा करण्यात येत आहे.

‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटातील बूट फेकल्याच्या आणि स्कूटरवर चढण्याच्या दृश्यासह कोर्टातील आक्षेपार्ह संवाद वगळून हा चित्रपट ठरलेल्या नियोजनानुसार १० फेब्रुवारी २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अ हा आचित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटाचा सिक्वल आहे. अक्षय कुमार आणि हुमा कुरेशी यांच्यासोबत अन्नू कपूर या चित्रपटात दिसेल.