News Flash

अक्षय कुमार आता जिंकणार ऑलिम्पिक पदक

१९४८ मध्ये लंडनमध्ये झालेल्या १४ व्या ऑलिम्पिकची कथा आहे

अक्षय कुमार

अक्षय कुमार ज्या सिनेमांची निवड करतो ते सिनेमे फार वेगळे असतात. सहसा असे सिनेमे करायला कोणी धजावत नाही ते सिनेमे हा खिलाडी कुमार करतो. देशभक्तीपर आणि सत्य घटनेवर आधारीत सिनेमे करण्याकडे त्याचा अधिक कल असतो. यावेळी त्याची नजर ऑलिम्पिक सूवर्ण पदकावर पडली आहे. हाच आहे खिलाडी कुमारचा आगामी सिनेमा.

अक्षय कुमार रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या निर्मितीमध्ये बनणारा गोल्ड या सिनेमात काम करणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन रीमा कागती करणार आहे. १९४८ मध्ये लंडनमध्ये झालेल्या १४ व्या ऑलिम्पिकची कथा आहे. या १४ व्या ऑलिम्पिक खेळात स्वातंत्र्यानंतर भारताला पहिले सूवर्ण पदक मिळाले होते. ही त्याचीच कथा आहे. अक्षयचा हा गोल्ड सिनेमा २०१८ च्या स्वातंत्र्य दिनी येणार आहे. स्वतः अक्षयने याचा पहिला पोस्टर त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. आता त्याचा हा सिनेमा नवीन काय घेऊन येतो हे २०१८ मध्येच कळेल.

निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा नावाजलेला चॅट शो ‘कॉफी विथ करण’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शोमध्ये नेमकी कोण कोणते कलाकार येणार आहेत याबद्दल उत्सुकता अनेकांमध्ये आहे. आता यात अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे जोडपेही येणार असल्याची चर्चा सिनेवर्तुळात सुरु आहे. पहिल्यांदाच अक्षय आणि ट्विंकल एकत्र या शोमध्ये जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 6:30 pm

Web Title: akshay kumars news film gold first poster release
Next Stories
1 भाजप सरकारला मी गांभीर्याने घेत नाही- अभय देओल
2 रणबीरसह लग्नाचा प्रस्ताव येताच अनुष्का म्हणाली ‘ओह नो!’
3 आगीत तेल ओतायला लावू नका- कल्की कोचलीन
Just Now!
X